दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात…

“मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण आमच्या निवडणूका कधी लागणार हे माहित नाही. कारण मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील, हे माहित नाही” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टिझर प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण […]

Raj Thackeray

Raj Thackeray

“मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण आमच्या निवडणूका कधी लागणार हे माहित नाही. कारण मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील, हे माहित नाही” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टिझर प्रदर्शनावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, “मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण आमच्या निवडणूका कधी लागणार? कारण मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील, हे माहित नाही” ते पुढे म्हणाले की पण सध्या निवडणुका लागतील असं वाटतं नाही. कारण निवडणुका फक्त येत नाहीत तर त्या वातावरणात असतात आणि सध्या मला वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

ममता बॅनर्जींनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार; म्हणाले, मोदींना खुश करण्यासाठी…

‘महाराष्ट्र शाहीर’चा टिझर प्रदर्शित

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला. २०२३ हे वर्ष शाहीर अमर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त केदार शिंदे आपल्या आजोबांचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकणार आहे. चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्षित होणार असून आज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी शाहीर यांच्या काही आठवणी सांगितल्या, ते म्हणाले की मी लहानपणी शाहीर यांना पाहायचो. लहानपणी फक्त ‘जयजय महाराष्ट्र माझा’वाले एवढीच मला ओळख होती. पण बाळासाहेब ठाकरे यांना बाळ म्हणून हाक मारणारे जे फार कमी लोक होते, त्यापैकी शाहीत होते, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.

वादातला चित्रपट पुन्हा चर्चेत! मावळ्याला फोटो काढण्याचा मोह पडला महागात…

Exit mobile version