वादातला चित्रपट पुन्हा चर्चेत! मावळ्याला फोटो काढण्याचा मोह पडला महागात…

वादातला चित्रपट पुन्हा चर्चेत! मावळ्याला फोटो काढण्याचा मोह पडला महागात…

वेडात मराठे वीर दौडले सात : वादात अडकलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक कलाकार दरीत कोसळल्याची घटना घडलीय. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातील पन्हाळा परिसरात सुरु होतं, त्याचवेळी ही घटना घडली.

Devendra Fadanvis : नागपूरमध्ये एकही बस ‘डिझेल’वर धावणार नाही… आणखी २५० इलेक्ट्रिक बस देणार!

चित्रपटाचं चित्रीकरणाचा शेवट झाल्यानंतर पन्हाळागडावरील सज्जा कोठीवरुन एक जण दरीत पडला आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून नागेश तरडे असं या तरुणाचं नाव आहे.

सध्या या तरुणाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तो गंभीर जखमी झाला आहे. चित्रीकरण संपल्यावर नागेश हा मावळ्याच्या वेशात निघण्याची तयारी करत होता. त्याचवेळी एक फोटो काढण्याचा मोह त्याला आवरला नाही.

एक गाय विकायचो अन् एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला किस्सा

फोटो काढण्यासाठी तो किल्ल्यातील कोठीच्या तटबंदीवर चढला असतानाच त्याचा पाय घसरला. पाय घसरुन नागेश खोल दरीत पडला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती नाजूक आहे.

त्यामुळे वादात सापडलेला हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला असून चित्रपटाबाबत घोषणा झाल्यानंतर चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटात मावळ्यांनी केलेला पेहरावावरुन वादाची ठिणगी पेटली होती. आता पुन्हा एकदा चित्रपटाविषयी चर्चा रंगलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube