एक गाय विकायचो अन् एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला किस्सा

एक गाय विकायचो अन् एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला किस्सा

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, राजकारणात येण्याआधी अजित अजित पवारांनी काय उद्योग केले हे तुम्हाला ठाऊक नसेल. अजित पवार यांनी दुधाचा व्यवसाय केला होतं, असं तुम्हाला सांगितलं तर नवल वाटले. पण हो हे खरं आहे. खुद्द अजित पवारांनी एका कार्यक्रमात याचा खुलासा केला. मी दुधाच्या धंद्यातून पुढं आलेला कार्यकर्ता आहे, असं त्यांनी सांगितलं.

जलील औरंगाबादमध्ये जन्मले, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मरतील, राजा सिंह ठाकुरांचा जालीलांना टोला

अजित पवार यांनी सांगितलं की, मी दुधाच्या धंद्यातून पुढं आलेला कार्यकर्ता आहे. माझे वडील वारल्यानंतर माझं खऱ्या अर्थाने बस्ताने डेअरीमुळं बसलं. माझ्या जीवनात अनेक किस्से आणि प्रसंग आहेत, जे तुम्हाला सांगितले तर तुमचा पटणार नाहीत. पण एक किस्सा सांगतो. तुम्हाला खरं वाटणार पण, मी राजकारणात येण्याआधी एक गाय सात हजाराला विकायचो आणि एक एकर जमीन साडेसात हजाराला घ्यायचो. तेव्हा जमीनीचे दर कमी होते, आणि गायींबद्दल कुतूहल होतं. अजित पवार यांच्या हस्ते एका खाजगी दूध डेअरीचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, दहशतवादाचा गुन्हा दाखल!

ते म्हणाले, बारामतीमध्ये सुरुवातीपासूनच शेती आणि दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता. त्याकाळी शेतकरी आपल्या पशुधनाची पोटच्या लेकरांसारखी काळजी घ्यायचे. यावेळी त्यांनी आणखी एक त्यांच्या पाहण्यातला किस्सा सांगितला. ते म्हणाले, बारामतीच्या अवतीभवती असलेल्या गावात शेतकरी गायीसाठी फॅन लावत असतं. ते पाहून माझ्या लक्षात आलं होतं की, शेतीत राबल तर यश हमखास मिळतं.

जलील औरंगाबादमध्ये जन्मले, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मरतील, राजा सिंह ठाकुरांचा जालीलांना टोला

आताच्या गायींना योग्य पोषण मिळत असल्यानं त्या दूधही चांगलं देतात. शिवाय शेणखतीह भरपूर मिळत. गायींच्या आहारावर या शेतकऱ्यांचा चांगला अभ्यास आहे. हे शेतकरी दुपारी आणि रात्री गायीचं दुध काढतात.

दुपारचं दुध दुपारी अडीच वाजता काढतात. अन् रात्रीचं दुध हे रात्री अडीच वाजता काढतात. हे शेतकरी दुध काढण्यासाठी 12 तासाचं अंतर ठेवतात. त्यामुळं गायींच आरोग्यही चांगलं राहतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube