Download App

तर १० हजारांहून अधिक ‘पदवीधर’ मतदानापासून वंचित राहतील; पडळकरांच निवडणूक आयोगाला पत्र

  • Written By: Last Updated:

सांगली : राज्यात पदवीधर निवडणुकीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास,विधी व न्याय,वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या परिक्षा आहेत.यामुळे तब्बल १० हजारांहून अधिक ‘पदवीधर’ निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहतील. या मुद्द्याकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. आमदार पडळकर यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी पत्रात काय लिहले आहे ?

जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे, त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.

भारत हा युवकांचा देश आहे, या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम ‘पदवीधर’ आमदार करतात. मात्र तब्बल १० हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्दयाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी लिहीत आहे.

येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत, राज्यातील विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परिक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळे तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवार ‘पदवीधर’ आमदार निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.

लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम निवडणूका करत असतात. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशाया गंभीर मुद्दयाची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह १० हजार पदवीधर मतदारांना आहे.

Tags

follow us