हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर आले, इतक्या वर्ष ते कुठे लपले होते. असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. शिवाय आगामी काळात बिळात लपलेले अनेक उंदीर बाहेर येतील, अशी टीका ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी त्यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले की बाळासाहेबांचे विचार मानतो म्हणणारे मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या अपमानावर गप्प का आहेत? त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर स्वतः राजीनामा दिला पाहिजे. असं आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.
बाळासाहेबांचा एवढा अपमान आतापर्यंत कोणी केला नाही, तो या मुख्यमंत्र्यांना कसा सहन झाला? आता चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिल.
एका बाजूला मोहन भागवत मशिदी मध्ये जात आहेत, ते कव्वाली ऐकणार आहेत. तर दुसरीकडे हे सांगत आहेत की बाबरी आम्ही पाडली. तर त्यांना नक्की काय म्हणायचं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. राम मंदिरासाठी आम्ही कायदा करा असं म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. असा टोला देखील त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य म्हणजे भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत? असा सवाल त्यांनी विचारला.