“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?

“राजकारणातही काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करत कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानाला कुस्तीतून बादच व्हावं लागत.” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. या ट्विटमधुन देखील ते पुन्हा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. देवेंद्र […]

DCM Devendra Fadnavis reaction on Kolhapur Riots

DCM Devendra Fadnavis reaction on Kolhapur Riots

“राजकारणातही काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करत कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानाला कुस्तीतून बादच व्हावं लागत.” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. या ट्विटमधुन देखील ते पुन्हा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत राजकारणात पण कुस्ती असं कॅप्शन दिल आहे. अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे युती आणि जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यामाने छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम निकाली कुस्ती झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी बोलताना फडणवीसांनी राजकीय विषयांवरही भाष्य केलंय.

ठाकरे की शिंदे धनुष्यबाण कोणाचा? चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी रद्द

 

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “राजकारणातही काही कुस्त्या चालल्या आहेत. पण आपल्याला माहिती आहे, जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं. काही लोकं नशा करून कुस्त्या खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केले.”

ते पुढे म्हणतात की, “आमच्या राजकारणातही काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करत कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानाला कुस्तीतून बादच व्हावं लागत. जे असली मातीचे पहिलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. २०२४ ला पुन्हा जिंकू त्यामुळे असाच आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या.”

मविआच्या ऐक्याविषयी संभ्रमात टाकणाऱ्या पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊत म्हणाले, ‘त्यांच्या बोलण्यावरून….’

Exit mobile version