Download App

पती आयपीएस अधिकारी, वडील 5 टर्म आमदार अन् आता लेकीलाही मंत्रिपद, कोण आहेत मेघना बोर्डीकर?

पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.

  • Written By: Last Updated:

Meghna Bordikar : महायुती सरकारमधील (Mahayuti) नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज (15 डिसेंबर) पार पडला. महायुतीच्या तब्बल 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ या महिला आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मेघना बोर्डीक (Meghna Bordikar) आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.

राज्य मंत्रिमंडळ : बावनकुळे, विखे, मुश्रीफ, चंद्रकांतदादांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा विजयी झाल्या आणि आता त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. 14 वर्षांनंतर मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेय.

राज्य मंत्रिमंडळ : बावनकुळे, विखे, मुश्रीफ, चंद्रकांतदादांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

कोण आहेत मेघना बोर्डीकर?
मेघना बोर्डीकर पाच टर्म आमदार असलेल्या आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. रामप्रसाद बोर्डीकर यांचा परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वर्चस्व आहेत. ते पाच टर्म काँग्रेसकडून आमदार होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वडील रामप्रसाद बोर्डीकर यांच्यानंतर आता मेघना बोर्डीकर त्यांच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून भाजपमध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्या जिंतूर मतदारसंघाच्या आमदार आहेत. सोबतच त्या एक यशस्वी उद्योजिका आहेत. शिवाय, त्या पीडीसीसी बँकेच्या (परभणी) संचालक आहेत.

मेघना बोर्डीकर यांनी डी.वाय.पाटील विद्यापीठातून (पुणे) बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला.

राजकारण आणि समाजकारणात सक्रीय असतांना पुण्यात डीआयजी म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी दीपक साकोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. सध्या दोन्ही मुले लंडनमध्ये शिक्षण घेतात.

नवा फॉर्मुला, मंत्रिपदाची संधी फक्त अडीच वर्षांसाठी, अजितदादा नेमकं काय म्हणाले? 

दरम्यान, मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धन, महिला आणि तरुणांसाठी रोजगार कार्यक्रम निर्माण करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे, दारू व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम यासारखे अनेक कार्यक्रम बोर्डीकर यांनी राबवले.

बोर्डीकर यांनी पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारणासाठी उत्तम प्रयत्न केला होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचा मतदारसंघ, जो मुळात दुष्काळी भाग होता, तो पाणी टंचाईपासून मुक्त झाला.

दरम्यान, मेघना बोर्डीकर यांना मंत्रीपद मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून निघेल, अशी अपेक्षा परभणीकर व्यक्त करत आहेत.

follow us