डोक्यावर 7 कोटींचं कर्ज अन् पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ; मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
Property of MLA Meghna Bordikar : परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मेघना बोर्डीकर यांनी उमेदवारी (Meghna Bordikar) अर्ज दाखल केला असून त्यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिलं आहे.
जिंतूरमध्ये तिसऱ्या भिडूची एन्ट्री; बोर्डीकर-भांबळे लढाईत नवा ट्विस्ट
मेघना बोर्डीकर यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात तीन पटीने वाढ झाली आहे. तर, त्यांच्यावर एकूण सात कोटी 74 लाखांचं कर्ज देखील आहे. 2019-20 साली 61 लाख 90 हजार एवढे वार्षिक उत्पन्न असलेल्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे 2023-24 मध्ये हेच उत्पन्न तीन पटीने वाढून 1 कोटी 70 लाख 43 हजार रुपये एवढे झाले आहे.
एकूण जंगम मालमत्ता
मेघना बोर्डीकर यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख एक लाख 85 हजार 918 आहेत. सात लाख 43 हजार रुपयाचे सोने असून 78 हजार रुपयांची सोन्याचे दागिने आहेत. मेघना बोर्डीकर यांच्या विविध बँक खात्यात, तसेच शेअर्स बोंड यामध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे.
स्थावर मालमत्ता
21 कोटी 74 लाख 45 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आमदार मेघना बोर्डीकरांकडे आहे. त्यांच्याकडे 18 हेक्टर शेतजमीन असून त्याची बाजार मूल्य पाच कोटी 29 लाख 57 हजार एवढे आहे. त्यांच्याकडे असलेल्या बिगर शेती जमिनीचे बाजार मूल्य 11 कोटी 49 लाख 11 हजार एवढे आहे. पुण्याच्या वडगाव शेरी येथे वाणिज्यिक इमारत असून तिचे बाजारमूल्य 3 कोटी 72 लाख 54 हजार एवढे आहे. आमदार बोर्डीकरांचे ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथे राहते घर असून त्याची किंमतही एक कोटी 23 लाख 21 हजार रुपये एवढी आहे.
मेघना बोर्डीकर यांच्यावर सात कोटींचे कर्ज
आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून तीस कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर विविध बँकांचे सात कोटी 74 लाख 12 हजार रुपयांचे कर्ज आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांच्यावर तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दहा गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर दोषारोप पत्र सिद्ध करण्यात आले आहे. तर दोन गुन्ह्यांमध्ये अद्यापही दोषारोप सिद्ध करण्यात आला नाही.