…मग तो निधी घरी ठेवला होता का? जिंतूरच्या विकासावरून अजित पवार आणि बोर्डीकर आमने-सामने

Ajit Pawar यांनी जिंतूरच्या विकासाबाबत वक्तव्य करताना मेघना बोर्डीकरांवर टीका केली होती. त्यानंतर बोर्डीकरांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar and Mehana Bordikar Criticize Each Other for Development of Jintur : सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. यासाठी राज्यातील मोठे नेते देखील स्थानिक पातळीवर जाऊन सभा घेत आहेत. यामध्येच सोमवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी बारामतीचा दाखला देत जिंतूरच्या विकासाबाबत वक्तव्य केलं. मात्र हे वक्तव्य करताना तेथील भाजप नेते आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता बोर्डीकर यांनी अजित पवारांना चोख प्रतिउत्तर देत प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाल्या मेघना बोर्डीकर?

अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, कायम सत्ता केंद्र हे बारामतीत राहिलं आहे. अजित दादांनी बारामतीला जेव्हा दहा रुपये लागत असतील तेव्हा शंभर रुपये निधी दिलेला आहे. त्यामुळे बारामतीचा विकास होणे बरोबरच आहे. मग असाच विकास इतर नगरपालिकांचा का झाला नाही? त्याचबरोबर जिंतूर नगरपरिषदेवरही त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाची सत्ता होती, मग तेव्हा अजित पवारांनी जर निधी दिला असेल तर तुला त्यांच्या घरी ठेवला होता का? असा सवाल उपस्थित करत बोर्डकर यांनी अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

जिंतूर नगर परिषदेच्या प्रचार सभेसाठी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या धरतीवर करू. हा विकास करणे म्हणजे येड्या गवळ्याचं काम नाही. असं म्हणत त्यांनी बोर्डीकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर अजित पवार बीड आणि नांदेडमधील सभांमध्ये बोलताना म्हटलं होतं की, मी कामाचा माणूस आहे, आधी काम करतो मग बोलतो. तर काही नेते आणि त्यांचे शहरं मात्र भिकारचोट असतात. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या भागात हे करून दाखवले त्यानंतर तुम्हाला बोलतोय. तसेच जे लोक माझ्यावर आरोप करतात त्यांनीच मला या अगोदर मुख्यमंत्री बनवलं होतं. असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना देखील अजित पवारांचे ते केलं सामोरे जावे लागलं होतं.

 

 

follow us