Download App

रेव्ह पार्टीत अडकलेले खडसेंचे दुसरे जावई प्रांजल खेवलकर कोण आहेत ?

रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर यांच्याशी दुसरा विवाह झालेला आहे. रोहिणी खडसे यांचा पहिला पतीपासून घटस्फोट झालेला आहे.

  • Written By: Last Updated:

who is pranjal khewalkar : हनीट्रॅप प्रकरणावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. यात पुण्यात एक रेव्ह पार्टीवर धाड पडते. त्यात सात जणांना अटक होते. त्यात एक नाव असतं प्रांजल खेवलकर यांचे. ते आहेत एकनाथ खडसे यांचे दोन नंबरचे जावई व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती. त्यावरून पुन्हा खडसेंना महाजन यांनी घेरलंय. पण प्रांजल खेवलकर (pranjal khewalkar) हे कोण आहेत. त्यांचा व्यवसाय काय हे पाहुया…

प्रांजल खेवलकरसह सात जणांना अटक
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी परिसरातील एका हायप्रोफाइल रेव्ह पार्टीवर धाड टाकलीय. ही रेव्ह पार्टी खराडीतील एका उच्चभ्रू निवासी भागातील फ्लॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केलायं. या धाडीत दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तीन महिला या फरार झाल्याचे बोललं जातंय. त्यांचा शोध पोलिस घेतायत. (who is pranjal khewalkar)

जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर… एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘अडकवलं जातंय…’

रोहिणी खडसेंचा बालपणीचा मित्र ते जीवनसाथी…
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी शारदा हिचा गिरीश चौधरी यांच्याशी विवाह झालेला आहे. ते परदेशात व्यवसायासाठी स्थलांतरित झाले होते. परंतु 2014 ला देशात आले होते. त्याचवेळी पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यात गिरीश चौधरी यांचे नाव येते. ईडीकडून चौधरी यांना या प्रकरणात 2021 ला अटक झाली होती. या जमीन घोटाळ्यामुळेच एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले. तर रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर यांच्याशी दुसरा विवाह झालेला आहे. रोहिणी खडसे यांचा पहिला पतीपासून घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर त्यांनी बालमित्र प्राजंल खेवलकर यांच्याशी लग्न केलंय. ते खडसेंचे दोन नंबरचे जावई आहेत. रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत.


प्रांजल खेवलकर कोणता व्यवसाय करतात?

खेवलकर हे रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत. प्रांजल खेवलकरांनी त्यांच्या प्रभावी व्यावसायिक कौशल्यामुळे अनेक उद्योगांमध्ये यश मिळवले आहे. साखर, वीज आणि रिअल इस्टेटपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीची भूमिका बजावलीय. त्यांची संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लिमिटेड ही कंपनी ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. त्यांची एपी इव्हेंट्स अँड मीडिया ही कंपनी आहे. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी आहे.


‘सोनाटा लिमोझिन’ कारमुळे चर्चेत

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यापूर्वी ‘सोनाटा लिमोझिन’ कारमुळे चर्चेत आले होते. या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.

या कारवाईवर मात्र एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केलाय. आमचे जावई दोषी असतील तर मी त्यांचे समर्थक करणार नाही. पण हे सर्व घडतंय की घडवलं जातंय, अशी शंका एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलंय. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी हे घडणार होतं तरी जावयाला सांभाळला हवं होतं, असा टोला लगावलाय. भोसरी जमीन घोटाळ्यात पहिल्या जावयामुळे खडसे यांना मंत्रिपद गमवावे लागले. त्यांना उतारवयात भाजपमधून बाहेर पडावे लागले. तर आता दुसरे जावई प्रांजल खवलकरांमुळे खडसेंची पुन्हा नाचक्की झाली हे नक्की.

follow us