शिरूरमध्ये 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

पुणे : खासदार अमोल कोल्हे हे नाराज नाहीत ते सतत आमच्याशी चर्चा करत असतात संपर्क साधत असतात. तसेच शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का नाही. हे मी सांगू शकत नाही तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तो अधिकार मला नाही. शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का? असा […]

Untitled Design (10)

Untitled Design (10)

पुणे : खासदार अमोल कोल्हे हे नाराज नाहीत ते सतत आमच्याशी चर्चा करत असतात संपर्क साधत असतात. तसेच शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का नाही. हे मी सांगू शकत नाही तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तो अधिकार मला नाही. शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का? असा प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी असं उत्तरं दिलं आहे.

यावेळी राज्यात सुरू असलेल्या महापुरूषांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शिंदे गट आणि भाजपकडून त्यांचे अपयश झाकण्याकरिता भाजपचे नेते अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. सतत लोकांना मुळ विषय लोकांना कसा लक्षात येणार नाही हे ते पाहतात. अशी टीका यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान खासदार अमोल कोल्हे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित नसतात. मात्र या चर्चांवर वळसे पाटील यांनी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version