सोलापूर लोकसभेची (Solapur Loksabha) जागा काँग्रेसने (Congress) लढवायची की राष्ट्रवादीने (NCP) याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. जयंत पाटील सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पाटील यांनी पक्षाच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे येणार, असं विधान केलं होत. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आम्ही पक्षीय स्तरावर कोणतीही चर्चा केलेली नाही तर स्थानिकांना विश्वासात घेऊन आम्ही राज्य पातळीवर चर्चा करणार आहोत. सोलापूरच्या जागेसंदर्भात पक्षीय पातळीवर कोणतीही चर्चा झाली नसल्यामुळे स्थानिक पातळीवर झालेले आरोप – प्रत्यारोप निरर्थक आहेत. असंही यावेळी ते म्हणाले.
Solapur Politics : सोलापूर लोकसभेसाठी बड्या नेत्यांचा पुढाकार, शिंदे- पाटील भेटले
जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेतला गेल्याची माहिती दिली. पक्षाच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.
बच्चू कडू यांनी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील २० ते १५ आमदार हे फुटणार असून ते शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील. असा दावा केला होता. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर हा विषय मला माहित नाही. असं म्हणून त्यांनी यावर बोलणं टाळलं.