Download App

चिंचवडचा उमेदवार अचानक का बदलावा लागला? अजित पवार म्हणाले…

मुंबई : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन राजकीय (Political)वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळातंय. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीत (NCP) चांगलीचं खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kalate)यांच्या नावाची चर्चा होती. पुढं अचानक उमेदवार का बदलावा लागला? याबद्दल अजित पवार यांनी (Ajit Pawar)आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. याबद्दल बाहेरचे लोकं आम्हाला विचारु शकत नाहीत. आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतो.

त्या जागेसाठी आमच्याकडं 11 नावं होती. त्या अकरा-बारा नावांमधून एकच फायनल होणार होतं. तुम्ही मीडियानं ठरवलं की एखादं नाव कदाचित निश्चित होईल, पण दुसरंच नाव निश्चित झाल्यावर तुमचा अंदाज चुकला. तुमच्या अंदाजाशी मला काय देणंघेणं आहे? असा प्रश्नही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलाय.

पवार म्हणाले, बातम्या सगळ्याच खऱ्या नसतात. तो अधिकार आमचा आहे. ती जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर आमचे राष्ट्रीय नेते ज्यांनी अनेक 55 वर्षात निवडणुका लढवल्यात, अनेकदा सरकार स्थापन केलंय, अनेकदा देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शरद पवारांनी सल्ला-मसलत करुन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काही विचार केला असेल. तो आमचा अधिकार आहे ना? तो आम्ही वापरला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Ajit Pawar यांना शिंदे गटाच्या बंडाचा सुगावा कसा लागला?

आता कलाटे विरुद्ध काटे यांच्या लढतीबद्दल पवार म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागितलंय की, माझे शिवसैनिक आणि पदाधिकारी हे नाना काटे यांच्यासाठी काम करणार. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तिथं त्या पद्धतीनं मेसेज दिलाय. त्यामुळं कोणतीही अडचण येणार नसल्याचं यावेळी पवार यांनी सांगितलं. कधीकधी तिरंगी लढाईत फायदाही होतो. तोटाही होता. फॉर्म भरले आहेत, छाननी होईल. जवळपास 40 लोकांनी फॉर्म भरले आहेत. त्यापैकी अनेक फॉर्म बाद होतील, असंही पवार म्हणाले.

Tags

follow us