Aditya Thackeray यांच्या विरोधात शिंदे गट भाजप नेत्याच्या जावयाला उतरविणार ?

मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत ठाकरे कुटुंबातील कोणीही कोणत्याही स्वरुपाची निवडणूक लढवली नव्हती. परंतु याला अपवाद आदित्य ठाकरेंचा. त्यांनी 2019 साली मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता त्यांच्या विरोधात शिंदे गट ठाकरे (Shinde group) घराण्याचाच उमेदवार देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे चुलत बंधू निहार ठाकरे (Nihar Thackeray) […]

Untitled Design (97)

Aditya Thackeray

मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत ठाकरे कुटुंबातील कोणीही कोणत्याही स्वरुपाची निवडणूक लढवली नव्हती. परंतु याला अपवाद आदित्य ठाकरेंचा. त्यांनी 2019 साली मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता त्यांच्या विरोधात शिंदे गट ठाकरे (Shinde group) घराण्याचाच उमेदवार देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे चुलत बंधू निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आदित्य ठाकरे हे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमदारकीचा राजीनामा देत वरळीतून लढण्याचे आव्हान दिले होते.

यानंतर त्यांनी शिंदेंना थेट ठाण्यातूनच निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. यावरुन शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. यावरुन आता शिंदे गट आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातच घेरण्याची शक्यता आहे.

कोण आहेत निहार ठाकरे ? निहार ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपूत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते भाजपचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. निहार हे पेशाने वकील असून सध्या ते निवडणूक आयोगात व सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू लढवत आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज शिंदे गटाकडून वरळीमध्ये जाहीर सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी शिंदे व फडणवीस आदित्य ठाकरेंना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version