Download App

सत्यजित तांबे कॉंग्रेसमध्ये परत येणार का, तांबेंपासून ते थोरातांपर्यंत काय म्हणाले पटोले? वाचा

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिवसेना फुटीनंतर आता कॉंग्रेसमध्ये नवा राजकीय अध्याय पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या महानाट्याविषयी बोलतांना पटोले म्हणाले, कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना विधानपरिषदेचं तिकीट दिले होते. सत्यजित यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त पक्षाकडे व्यक्त केली नाही. तसं ते बोलले असते तर आम्ही त्याला निश्चितपणे ‘एबी फॉर्म’ दिला असता. फॉर्म भरायच्या दिवशी मी सुधीर तांबेशी त्यांच्याशी बोललो की, ते तुम्ही निवडणून येणार आहात. कारण, तुमचा रिपोर्ट चांगला आहे. शिवाय, पक्षही तुमच्या सोबत आहे. मात्र, ते जेव्हा फॉर्म भरायला गेले. तेव्हा त्यांच्यासोबत फॉर्म भरत असतांना त्याचं कुटूंब होतं. त्यावेळी त्यांनी जे करायचं ते केलं. महत्वाचं म्हणजे, तेव्हा भाजपने फॉर्म भरला नाही. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. निवडणुकीत भाजपने (BJP) त्यांना छुपा पाठिंबा दिला. त्यानंतर या घडामोडी आम्ही हायकमांडला कळवल्या. त्यानंतर हायकमांडने तांबे पिता-पुत्राचं पक्षातून निलंबन केलं. दरम्यान, भाजपला दुसऱ्याच्या घरात आग लावायला आवडतं. आणि त्यात त्यांना आनंद मिळतो, अशी खोचक टीकाही पटोले यांनी केली.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनाम्याविषयी बोलतांना पटोले म्हणाले, की, आत्तापर्यंत, आमच्या रेकॉर्डवरून असं दिसून येते की त्यांनी राजीनामा दिला नाही. थोरात साहेब CLP नेते आहेत. कारण, अद्याप तसं कोणंतही औपचारिक पत्र मिळालेले नाही. मी आमदार आहे आणि ते विधानसभेत आमचे नेते आहेत. त्यांच्या दुःखाची कारणे मला माहीत नाहीत, असं पटोले म्हणाले. सध्या महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये जे मतभेद दिसतात, ते मतभेद रायपूर येथे होणाऱ्या अधिवेशनादरम्यान (24 ते 26 फेब्रुवारी) हायकमांडद्वारे हे मतभेद सोडवले जातील, असं पटोले म्हणाले.

BBC IT Raids : लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर.., उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

काल संगमनेरमध्ये बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले, सत्यजित यांना काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही सत्यजित शिवाय करमणार नाही, असं म्हणत सत्यजित तांबेंना कॉंग्रेसमध्ये परत येण्याचे संकेत दिले. त्याविषयी बोलतांना पटोले म्हणाले, सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबन करण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे. आताही सत्यजित यांच्या बाबतीत हायकमांड जो निर्णय घेईल त्याला माझी हरकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात भाजपनं ज्या पध्दतीने कॉग्रेसची वाताहत केली, त्याचा बदला मी जरुर घेईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला. त्यासाठी कॉंग्रेसने रणनीती आखल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

नाना पटोलेंवर होत असलेल्या हुकूमशाहीच्या आरोपाविषयी बोलतांना ते म्हणाले, जनतेच्या हितासाठी आणि पक्षाच्या हितासाठी शिस्त आणण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याला कोणी हुकूमशाही म्हणत असेल तर माझा नाईलाज आहे. पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही करावं लागेल, ते सगळं मी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us