Devendra Fadnavis on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होतील अशी चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीने याप्रमाणे तयारी सुरु केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशी कोणतीही शक्यता नाही. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्यावेळी होतील आणि विधानसभेच्या निवडणुका विधासभेच्या वेळी होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून भाजपने बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय नेत्यांचे आणि राज्यातील नेत्यांचे दौरे सातत्याने केले जात आहेत. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुन्हा बारामती दौऱ्यावर येत आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की बारामतीवर लोकांच जास्त लक्ष असतं. त्यामुळे लोकांना तेथील दौरे दिसतात. बारामती लोकसभा मतदारसंघावर पत्रकारांचा जास्त लक्ष असतं. आम्ही पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघावर लक्ष देत आहोत तेथे केंद्रीय नेत्यांचे सातत्याने दौरे होत आहेत बारामती त्यापेक्षा काही वेगळे नाही.
फडणवीस पुणेकर होणार? लोकसभा पोटनिवडणुकीआधी सूचक विधान
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्यांचे विभाजन करुन शिवनेरी जिल्ह्याची निर्मीती करावी अशी मागणी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की जिल्हा विभाजनच्या अनेक मागणी आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांचा एकच विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
🕤9.23pm📍Balewadi, Pune | संध्या. ९.२३ वा 📍 बालेवाडी, पुणे
LIVE | Media Interaction#Pune https://t.co/IFy6xwc5VC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 15, 2023
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत व कोणी कसे बसायचे कोणी कुठे उभे राहायचे कोणी बोलायचं यामध्ये वास सुरू आहेत हा प्रयोग नेत्यांच्या बद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.