फडणवीस पुणेकर होणार? लोकसभा पोटनिवडणुकीआधी सूचक विधान

  • Written By: Published:
फडणवीस पुणेकर होणार? लोकसभा पोटनिवडणुकीआधी सूचक विधान

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा होत असते. त्यात भाजपचे काही स्थानिक नेतेही ही मागणी करत असतात. आता पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात होते. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झाले आहे.

सुस-म्हाळूंगे येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी उपस्थित होते. तर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या ऑनलाइन उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकर बनाव, असे म्हटले.

महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप…

त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, स्वभावाने व जन्माने मी नागपूरकर आहे. कर्माने मुंबईकर आहे. प्रेमाने पुणेकर आहे. पुण्याचे माझ्यावर प्रेम आहे. माझे पुण्यावर प्रेम आहे. पुणे एेतिहासिक शहर आहे. भविष्यातील शहर असून, नॉलेज सिटी आहे. आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचवेळी आयटीची राजधानी पुणे आहे.

‘फडणवीस यांच्यामुळे बीपी वाढतो किंवा कमी तरी होतो…’

पुण्यातील उत्पादन क्षेत्राबाबत फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हा मॅनफॅक्चरिंग हब आहे. त्यात देशात वीस टक्के उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी शिक्षण, आरोग्य सुविधा मुबलक असल्या पाहिजे. पुण्यात अनेक प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजनासाठी यायचे म्हटले तर वर्षातून शंभर दिवस पुण्यात यावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube