महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप…
कोरोना काळात महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली असून आढावा आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन पैदा झालेलं लोकं नाहीत तर संघर्ष करणे हाच आमचा डीएनए आहे. पुण्यातल्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करुन लोकांचे मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या सरकारविरोधात भाजपने संघर्ष केला, असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.
संघर्षातून भ्रष्टाचारी सरकारला आम्ही वटणीवर आणण्याचं काम आपण केलं. कोरोना काळात दररोज सरकार सर्वसामान्य माणसांवर अन्याय करीत होतं. त्यावेळी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण भाजपचा डीएनएच संघर्षाचा असल्याचं ते म्हणाले आहेत.
कर्नाटकात राष्ट्रवादी तोंडावर आपटली; 5 उमेदवारांना दोनशेच्या आत मतं
भाजपच्या कार्यकर्त्यांवर अनेक केसेस दाखल झाल्या पण आम्ही जिथं जनतेवर अन्याय होईल तिथं शांत बसू शकत नाही. अन्यायाविरोधात आम्ही लढा देणारच असल्याचा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी यावेळी विरोधकांनी दिला आहे.
Madhuri Dixit : “त्या’ किसिंग सीनचा… ” अभिनेत्री ‘धकधक गर्ल’ने घेतला होता मोठा निर्णय
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत देश जगात एक महत्वाचा देश बनला आहे. पंतप्रधान मोदींमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला महत्व प्राप्त झालं असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी भाष्य करीत काँग्रेसवर अपप्रत्यक्षपणे टोलेबाजी केलीय.
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय मंचावर जेव्हा जायचे तेव्हा ते कधी जायचे अन् कधी यायचे हे कळत नव्हतं. मनमोहन सिंग यांना फोटोतही जागा मिळत नव्हती पण मोदीजी ज्या आंतरराष्ट्रीय मंचावर जातात तिथे सर्व देशाचे प्रतिनिधी मोदींच्या हातात हात मिळवायला येतात, मोदींच्या हातात मिळवण्यासाठी जगभरातील लोकं थांबत, असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.