आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांशिवाय कामकाज…

राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार असून दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार आहे.

winter session

winter session

Winter Session : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हे हिवाळी अधिवेशन (Winter Session) पहिल्यांदाच विरोधई पक्षनेत्याशिवाय चालणार आहे. विधीमंडळाच्या कामकाज पत्रिकेतमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवडीबाबत कोणताही उल्लेख दिसून येत नाही. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यासाठी विधान परिषदेमध्ये कॉंग्रेसकडून सतेज पाटील तर विधानसभेत ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलंय.

हिवाळी अधिवेशन सात दिवस चालणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातील प्रश्नांबाबत जनतेला मोठ्या अपेक्षा लागून राहिल्या आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्यानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर शोकप्रस्ताव आणि दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले जाणार आहे.

दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुच असताना निवडणुकांचा या पुरवणी मागण्यांवर प्रभाव पडेल काय? त्यासंदर्भात सरकारकडून नवीन घोषणा करण्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version