Download App

मोदी-शाहांना लोकशाहीची सवय नाही; आता त्यांना…; योगेंद्र यादवांनी वर्तवला आणखी एक अंदाज

मुलाखतीदरम्यान यादव यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आलेख वाचून दाखवला. यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल पासून ते देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख येतील यावर भाष्य केले

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा अंतिम निकालानंतर चर्चा सुरू आहे ती म्हणजे निवडणूकपूर्व अंदाज काही प्रमाणात तंतोतंत सांगणाऱ्या योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांची. पण ही चर्चा त्यांच्या अचूक वर्तवलेल्या अंदाजामुळे नव्हे तर, निकालानंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे. मोदी शाहंना लोकशाहीची सवय नाही असे विधान यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. (Yogendra Yadav One More Prediction On New NDA Government)

सोशल मीडियावर हिरो, पण वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर ठरले झिरो; फॉलोवर्स गेले कुठे?

शाह मोदींनी लोकशाहीची सवय नाही

मुलाखतीदरम्यान यादव यांनी मोदी आणि शाह यांच्या कार्यपद्धतीवर थेट भाष्य करत दोन्ही नेत्यांना लोकशाहीची सवय नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नव्या NDA सरकारमध्ये त्यांना लोकशाहीचे निर्बंध आणि नियम दोन्ही पाळवी लागतील असे यादव म्हणाले. अटल बिहारी वाजपेयींना या सगळ्याची सवय होती असेही ते म्हणाले.

दक्षिणेकडील पक्ष असल्याने मोदी शाह कात्रीत

नव्या सरकारमध्ये दक्षिणेकडचा तेलुगू देसम पक्ष येत त्यामुळे या दोन्ही नेत्यांना हे मोदी सरकार नसून आघाडी सरकार आहे याची जाणीव होईल. याशिवाय दक्षिणेतील पक्ष सातत्याने दक्षिणेला हेटाळण्याच्या धोरणाचा तेलुगू देसम पक्ष विरोध करू शकतो. तसेच मतदारसंघ पुनर्रचनेला ते विरोध करू शकतात. याशिवाय टीडीपी आणि जदयूसाठी मुस्लीम व्होटबँक महत्त्वाची आहे. त्यामुळे ते मुस्लीम विरोधी धोरणं किंवा हिंदू-मुस्लीम मुद्द्याला विरोध करतील असेही यादव म्हणाले आहेत.

‘ब्रँड मोदी’ महाराष्ट्रात फेल! 17 मतदारसंघात PM मोदींच्या सभा; फक्त तिघेच विजयी..

…तर अधिक कठीण काळ असेल

मुलाखतीदरम्यान यादव यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आलेख वाचून दाखवला. यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल पासून ते देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख येतील यावर भाष्य केले. ते म्हणाले की, या दोन्ही गोष्टी मोदींच्या कार्यकाळात जाहीरपणे सांगण्यात आल्या. पण, त्यानंतर यावर काहीच भाष्य केले गेले नाही. मात्र, नव्या सरकारमध्ये भाजपला असे वागून चालणार नाही.

नितीश-नायडूंच्या सौदेबाजीनं वाढली मोदी-शहांची डोकेदुखी; TDP कडून ‘या’ 5 मंत्रालयांची मागणी

गेल्या 10 वर्षांत मोदींना फक्त कोणतीही गोष्ट जाहीर करून टाकण्याची सवय होती. त्यामुळे नव्या सरकारमध्ये सुरूवातीला काळात मोदी-शाहंना हे जड वाटू शकते. त्यामुळे एक तर, हे निर्बंध टाळण्यासाठी शॉर्टकट किंवा थेट विरोध केला जाईल. असे झाले तर येणार काळ देशासाठी आणि राजकाणासाठी अधिक असेल असे यादव म्हणाले. पण असे न झाल्यास ही देशासाठी आणि देशवासियांसाठी अतिशय चांगली गोष्ट असेल असेही यादव यांनी स्पष्ट केले.

follow us

वेब स्टोरीज