Sharad Pawar : तुम्हाला चारवेळा उपमुख्यमंत्री केलं… लेकीला कोणतचं पद दिलं नाही; शरद पवारांचा पहिला थेट वार

Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला […]

Ajit Pawar, Supriya Sule, Sharad Pawar

Ajit Pawar, Supriya Sule, Sharad Pawar

Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला होता. त्यावर आता स्वतः शरद पवारांनी पहिल्यांदाच उत्तर देत अजितदादांना सुनावले आहे. ( You were DCM for four time Supriya Sule not for a time too Sharad Pawar answers to Ajit Pawar )

‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!

काय म्हणाले शरद पवार?

एका वाहिनीला शरद पवारांनी मुलाखत दिली यावेळी शरद पवारांना अजित पवारांच्या मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? या विधानावर प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, कुटुंबातील विषयांवर मी सार्वजनिक ठिकाणी बोलणं मला पसंत नाही. मात्र अजित पवारांना मंत्री, चारदा उपमुख्यमंत्री केलं. मात्र सुप्रियाला कधीच कोणत पद दिलेलं नाही. केंद्र सरकारमध्ये पक्षाला मंत्रीपद मिळालं होतं. तेव्हा देखील मी सुप्रिया खासदार असतानाही तिला ते दिलं नाही.

तुम्ही सर्व परत या, मी अन् जयंतराव बाहेर पडतो; आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

त्यानंतर पुन्हा पक्षाला मंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा संगमा यांच्या मुलीला संधी दिली. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेलांना देखील संधी दिली मात्र सुप्रियाला नाही. प्रफुल्ल पटेलांना तर लोकसभेला निवडूण आले नव्हते. तरी संधी दिली होती. तरी देखील अजित पवार आणि इतर लोक हे संधी न दिल्याचा आरोप करत आहेत कारण त्यांना भाजपसोबत जायचं आहे. मात्र त्यांना माहित नाही याचा प्लॅन भाजप कार्यालयात होत आहे. असं शरद पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार?

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची 5 जुलैला पहिलीच सभा झाली त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य करत जोरदार टीका केली. ते म्हणाले, प्रत्येकाचं एक वय असतं. आयुष्यभर काम केल्यानंतर एका टप्यावर थांबायला हवं. मग तो शेतकरी असो, सरकारी अधिकारी असो, उद्योगपती असो की राजकारणी… थांबण महत्वाचं आहे. अडवानी- जोशी निवृत्तही झाले. पण, आमचे वरिष्ठ नेते हे थांबायलाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत. पण हे नेमकं कशासाठी आहे? मी सुप्रियाला सांगितले की तू साहेबांशी बोल, त्यांना समजावून सांग.. पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

Exit mobile version