तुम्हाला पण ओहोटी येईल… भाजपवाले हे विसरू नका, राज ठाकरेंचा टोला

ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. भाजपने पण ते लक्षात ठेवावं की जरी आज तुमची सत्ता असली पण एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल. ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य केले त्यांची आज काय अवस्था आहे हे भाजपने विसरू नये, असे ठाकरे म्हणाले. गडाखांच्या ताब्यातला […]

Raj Thackrey 12

Raj Thackrey 12

ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. भाजपने पण ते लक्षात ठेवावं की जरी आज तुमची सत्ता असली पण एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल. ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य केले त्यांची आज काय अवस्था आहे हे भाजपने विसरू नये, असे ठाकरे म्हणाले.

गडाखांच्या ताब्यातला नेवासा दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय; दूध उत्पादक आणि कामगारांचा प्रश्न ऐरणीवर 

दिवस बदलत असतात आज जरी भाजपचे दिवस असले तरी उद्या दुसऱ्या कोणाचे दिवस येतील हे भाजपने लक्षात ठेवले पाहिजे. जे लोक आज सत्तेमुळे तुमच्याकडे आले आहेत, तेच लोक सत्ता गेल्यावर तुम्हाला सोडून जातील, असा देखील टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

‘बापकमाई ही वाढवायची असते’; बाळा नांदगावकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज ठाकरे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेवर बोलताना म्हणाले की हे ज्यांनी आज गळ्यात गळे घातले त्यांनी टोलमुक्तीसाठी काय केले. आज महाराष्ट्रात जी काही टोलमुक्ती झाली आहे ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच झाली आहे.

हे लोक सत्तेत असताना त्यांनी फक्त एकमेकांचे धुणे धुतले बाकी यांनी काही केले नाही असा टोला देखील राज ठाकरे त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लगावला आहे.

Exit mobile version