Download App

उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप, तर… सुषमा अंधारे म्हणतात

  • Written By: Last Updated:

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती.

उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद हिच्या विरोधात आंदोलन देखील केलं होतं.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1608877744938717190

आज चित्रा वाघ यांनी उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार असा इशारा दिला होता. चित्रा वाघ यांच्या या इशाऱ्यानंतर उर्फी जावेद प्रकरणावर शिवसनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. जर अल्पसंख्यांक उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर आक्षेप घेऊ शकाल का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे
मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…
अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना) मारहाणीची भाषा कराल का?
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.

Tags

follow us