Download App

कसब्याच्या निकालावर 100 कोटींचा सट्टा, अंडरवर्ल्डचीही चांदी

पुणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि भाजपसाठी (BJP)प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) सट्टेबाजारातही ‘डाव’ लागला आहे. जिल्ह्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उद्या (दि.2) कसबा आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad)पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणारंय. त्यातल्यात्यात या कसबा पोटनिवडणुकीच्या लढतीमुळं सट्टेबाजार (Betting Market)आणि अंडरवर्ल्डला (Underworld)पुन्हा एकदा चमक मिळाल्याचा गुप्तचर विभागानं (Intelligence Division) अहवाल दिलाय. सट्टेबाजाराचा दर प्रत्येक तासाला बदलत आहे. मंगळवारी (दि.28) रात्री एक रुपयाला रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांना 45 पैसे व हेमंत रासने (Hemant Rasne)यांना 55 पैसे भाव असल्याची चर्चा कार्यकत्यांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत होतं. कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाजारात सध्या कमालीची तेजी पाहायला मिळतेय. देशात सहा ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या असल्या तरी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर जवळपास शंभर कोटी रुपयांचा सट्टा लागल्याची माहिती आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अलीकडच्या काळात गुडांचा वावर असल्याचं दिसून आलंय. नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीमध्ये अगदी ठाण्या-मुंबईपासून उत्तर प्रदेश व बिहारच्या निवडणुकीतील गुंडांचा वावर पुणेकरांच्या चिंतेमध्ये भर घालणारा ठरल्याचं दिसून आलं. या निवडणुकीच्या प्रचार काळात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचं समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमधून दिसून आलं. त्याची गंभीर दखल सर्वच पक्षांतील जाणत्या नेत्यांनी घेतलीय.

Sanjay Raut : राऊतांच्या वक्तव्यावरून विधान परिषदही गाजली…

या पोटनिवडणुकीत सर्व यंत्रणेलाच वेठीला धरल्याचं पाहून राजकीय कार्यकर्ते, नेतेच नव्हे तर सर्वसामान्य जनताही कमालीची अस्वस्थ झाल्याची पाहायला मिळतेय. पुण्यात यापूर्वी कोथरूड परिसरात अत्यंत चुरशीच्या झालेल्या एका निवडणुकीत मुंबईमधील तत्कालीन गॅंगस्टर अमर नाईक याची एका उमेदवारासोबतची सातत्यपूर्ण उपस्थिती अनेकांच्या तोंडात बोटं घालणारी ठरली.

पुढच्या काळात मुंबईतील अरुण गवळी, छोटा राजन यांच्या टोळ्यांचे अदृश्य चेहरे डोकावत असल्याचं दिसून आलं होतं. मध्यंतरीच्या काळात एका सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वर्तुळात ‘नाना’ नावानं परिचित असलेल्या नेत्यानं शहरातील बहुतेक सर्व गुंडांना हाताशी धरल्याची जोरदार चर्चाही झाली, मात्र या गँगस्टरची किंवा त्यांच्या टोळ्यांचा थेट हस्तक्षेप मतदारांना कधीही जाणवला नाही.

त्याला लोकसभेची एक निवडणूक अपवाद ठरलीय. त्या निवडणुकीमध्ये पाटलांना नाही तर खिलाडीला मदत करा असं नगरसेवकांना धमकावलं होतं. त्याची गंभीर दखल केंद्रीय नेत्यांनी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.

तसाच दबाव नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत घडल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. निवडणूक काळात स्थानिक गुंडांबरोबर विशेषतः ठाणे, मुंबई, पालघरमधील गँगस्टर्सचा हस्तक्षेपही असल्याचं दिसून आलंय.

एवढंच नाही तर ठाण्याच्या एका नेत्याच्या सूचनेवरून बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही गुंडही यामध्ये सहभागी असल्याचा एक अहवाल असल्याचं समजतंय. सर्वसामान्यांच्या पदरी काही पडलं नसलं तरी या निवडणुकीमुळं अंडरवर्ल्डची मात्र चांदी झाल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us