Download App

Video : पुण्यात तरूणाईचं चाललंय तरी काय? आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी

Pune मध्ये सध्या तरूणाई शिक्षणाव्यतिरिक्त गुन्हेगारी आणि नशा करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

13 bikes burnt by youngster mother refused to pay for intoxication in Pune : विद्येचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सध्या तरूणाई शिक्षणाव्यतिरिक्त गुन्हेगारी आणि नशा करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये आता पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाने आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने तब्बल 13 दुचाकी जाळल्या आहेत.

महाराष्ट्राला तोडू नका…मंत्र्यांना तंबी दिली पाहिजे, नाना पटोलेंनी केली कानउघडणी

पिंपरीतीस पिंपळ निलख या उच्चभ्रु सोसायटीतील मोरया क्षितीज बिल्डींग या सोसायटीमध्ये स्वप्नील शिवशरण पवार या व्यसनधीन तरूणाला त्याला त्याच्या आईने नशा करण्यासाठी पैसे न दिले नाही. म्हणून त्याने सोसायटीच्या दुचाकी पेटवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हे कृत्य खरचं केले. तेव्हा ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तेव्हा हा प्रकार उघडकी आला आहे.

Video : सोसायटीधारक ठरवणार, आवारात लिकर शॉप हवे की नको; सरकारचा दारू दुकानदारांना दणका

त्यानंतर या तरूणाविरूद्ध सोसायटीतील राहिवाश्यांनी तक्रार केली असून पोलिसांनी या तरूणाला अटक केली आहे. दरम्यान स्वप्नील हा उच्चशिक्षित तरूण आहे. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्यामुळ तो नशेसाटी पैसे न दिल्यास कुटुंबाला मारण्याची धमक्या देतो. यापूर्वी देखील त्याला तीन वेळा व्यसनमुक्ती केंद्रातून आणले आहे.

पुण्यात भररस्त्यात अश्लील कृत्य…

पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात गौरव आहुजा या तरूणाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित तरुण आणि त्याच्या मित्राने दारु प्यायली होती. यानंतर अश्लील वर्तन करण्यात आले. विशेष म्हणजे महिला दिनीच पुण्यासारख्या शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गौरव आहुजाने व्हिडिओ करुन माफी मागितली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याल ताब्यात घेतल्यानंतर त्याला आता न्यायालायाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनवली आहे.

follow us