Download App

पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात 2 वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली

NIA arrests two ISIS sleeper: पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख (Abdullah Fayaz Shaikh) आणि तल्लाह लियाकत खान (Tallah Liaquat Khan) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियात (Indonesia) लपून बसले होते. दरम्यान, लवकरच न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘…तिथूनच बाळासाहेब अन् माझ्यात दरी निर्माण झाली’; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट 

आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या आयएसआयएस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे हे आरोपी सदस्य आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून फरार होते आणि एनआयएच्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केलं होते. एनआयएने दोन्ही आरोपींची माहिती देण्यासाठी प्रत्येकी ३ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केलं होतं.

दरम्यान, एनआयएने पुण्यातील कोंढवा भागात छापा टाकून आयसिस मॉड्यूल उद्ध्वस्त केले होतं. मात्र, ते दोघेही इंडोनेशियाला पळून गेले होते. ते जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून लपून बसले होते अशी एनआयएची माहिती आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती इंडोनेशियाला दिल्यानंतर दोघांना डीपोर्ट करण्याचा निर्णय इंडोनेशियाने घेतला. त्यानंतर भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (T2) इमिग्रेशन ब्युरोने रोखले. यानंतर एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली.

‘…तिथूनच बाळासाहेब अन् माझ्यात दरी निर्माण झाली’; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट 

काय आहे प्रकरण?
हे प्रकरण आधीच अटक केलेल्या आठ इतर आयसिस स्लीपर मॉड्यूल सदस्यांसह भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी आणि हिंसाचार आणि दहशत पसरवून देशात इस्लामिक राजवट स्थापन करण्याच्या कटाशी संबंधित आहे. देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे हा त्यांचा उद्देश होता. पुण्यातील कोंढवा परिसरात अब्दुल्ला फैय्याज शेख यानी भाड्याने घेतलेल्या घरात दोन्ही आरोपी आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) बनवत होते. २०२२-२०२३ मध्ये, त्यांनी बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळा आयोजितकेली होती आणि नियंत्रित स्फोटांद्वारे आयईडीची चाचणी देखील केली होती.

दरम्यान, अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलहा खान यांच्या व्यतिरिक्त मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्या इतरांची नावे आहेत.

एनआयएने या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि आयपीसी विविध कलमांखाली आरोपपत्रे दाखल केलं असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

follow us