Download App

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील 37 आयटी कंपन्यांनी गाशा गुंडाळला, काय आहे नेमकं प्रकरण?

Hinjewadi IT Park: आशिया खंडातील सर्वात मोठी आयटी हब असलेल्या हिंजवडी आयटी पार्कच्यामधील अनेक कंपन्या येथील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतर करत आहेत.

37 Componies To Exit Pune Hinjewadi IT Park: पुण्यातील (Pune ) आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमधील अनेक कंपन्यांनी बाजार गुंडाळ्याची माहिती समोर आली आहे. (Hinjewadi IT Park) पुण्यातील वाहतुककोंडीची समस्या दिवसोंदिवस अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे. (Pune Traffic) त्यामुळेच हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक कंपन्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी राज्य सरकारला धारेवर धरत सोशल मीडिया (Social Media) पोस्ट केली आहे.


सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाले की, एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं…. गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केले नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन – दोन तास लागायला लागलेत तर ऑफिस मधून घरी येताना सुद्धा दोन तीन तासाचा प्रवास होतोय.

महापालिकेकडून पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी काम करण्याचं आव आणून नको त्या गोष्टींवरती पैसे खर्च करण्यात आले आहेत.महत्त्वाचे चौक, मोठे जंक्शन या ठिकाणी उड्डाणपूल,ग्रेड सेप्रेटर टाकून वाहतूक कोंडी कमी करता आली असती.परंतु कोणीही या गोष्टींकडे पुढच्या ४०-५० वर्षाचे नियोजन म्हणून पाहत नाही.

Maidaan : आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा ‘मैदान’! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर

पोलिसांच्या वाहतूक विभागाचे देखील यात अक्षम्य दुर्लक्ष होतंय.सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्करची गर्दी रस्त्यावर असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस, वॉर्डन उपस्थित राहिलेच पाहिजे. सदर बाबतीत जर पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले उद्योगमंत्री यांनी योग्य ती पाऊले उचलावीत. आता या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us