Download App

पुण्यातील मिलिटरी अकादमीचे 5 विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले, चौघांचे मृतदेह हाती, एक बेपत्ता

  • Written By: Last Updated:

Devgad Sea : देवगड येथील समुद्रात (Devgad Sea) पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. यामध्ये चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुण्यातील एका खासगी मिलिटरी अकादमीचे विद्यार्थी आहेत.

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस पुन्हा आक्रमक; विधानभवनावर धडकणार ‘हल्लाबोल’ मोर्चा 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात किनारी पर्यंटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अॅकेडमीची ३५ जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांना अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळं काही जणं अंघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. यातील चार जणांचे मृतदेह सापडले. मृत्यू झालेल्यांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. तर अद्याप एकजण बेपत्ता आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घघटना घडली. ही घटना दुपारी तीने ते चार वाजता घडल्याची माहिती आहे.

आपल्याच जाळ्यात अडकला बांग्लादेश, न्यूझीलंडने मिळवला थरारक विजय 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलिस अधिकारी, तहसीलदार रमेस पवार नगराध्यक्ष, साक्षी प्रभू घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या बेपत्ता मुलाचा शोध सुरू आहे.

सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर हा अजूनही बेपत्ता आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.

आतापर्यंत अनेक पर्यटक समुद्रात बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, देवगडची ही घटना त्यांच्यातील सर्वात मोठी घटना म्हणून पाहिली जाईल. देवगडचा समुद्रकिनारा खोल नाही. हा पर्यटकांसाठी सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. मात्र, पाण्याशी खेळण्याचा मोह आवरता येत नसल्यानं पर्यटकांना हकनाक जीव गमवावा लागतो.

Tags

follow us