राज्यस्तरीय 7 वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी; सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग तर्फे आयोजन

7th State-Level Jadhavar Science Festival Organized : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व डॉ. सुधाकरराव

7th State Level Jadhavar Science Festival Will Be Held On Saturday

7th State Level Jadhavar Science Festival Will Be Held On Saturday

7th State-Level Jadhavar Science Festival Organized : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व डॉ. सुधाकरराव जाधवर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ँड टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, विज्ञान विभाग यांच्या वतीने तसेच विद्यार्थी विकास मंडळ, विज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘सातव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल – १ येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सोसायटी ही यंदाच्या महोत्सवाची मुख्य संकल्पना आहे. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी), कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात होणार आहे. सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी फॉर ह्युमन वेल्फेअर, एन्व्हारमेंटल सस्टेनॅबिलिटी, वेस्ट टू वेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी अ‍ँड इंजिनिअरींग, एआय इन सिम्युलेशन, ऑटोमेशन सिस्टिम, स्मार्ट हॉस्पिटल इन फ्युचर, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी इन डाग्नोसिस अ‍ँड ट्रिटमेंट, ग्रीन इनोव्हेशन, हायड्रोलिक प्रेशर मशिन प्रिपरेशन, सायबर सिक्युरिटी, बिझनेस अ‍ॅनलॅटिक्स, थीडी प्रिंटींग इन मेडिसिन, कम्युनिटी इनोव्हेशन अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांपेक्षा अधिकची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिवल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळणार आहे. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख ३० डिसेंबर असून गटाप्रमाणे अनुक्रमे ७७९८१०११२२, ७३८७१४०५६५, ८८०६०४००२६, ७३८५८९७५३१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माझं कायम तुला सहकार्य अन्…, सनी निम्हण यांनी सांगितला फडणवीसांचा ‘तो’ किस्सा

संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती

भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असे अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

Exit mobile version