Download App

पतीसोबत भांडण, कराडला निघाली पण मिरजला पोहचली; तिथेच बलात्कार अन् कर्नाटकात विक्री

मिरज : पतीसोबत भांडण झाल्यानंतर सासर सोडून कराडला जाणाऱ्या आणि चुकून मिरजला पोहचलेल्या 23 वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा, त्यानंतर तिला लग्नासाठी कर्नाटकात नेऊन तिची चार लाखांत विक्री केल्याचा आणि परस्पर लग्न लावून दिल्याचा अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघड झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. (A 23-year-old married woman who was going to Karad and accidentally reached Miraj was gang-raped by five people)

महम्मद हुसेन महम्मदगौस शेख (31), अबुजर फारुख जमादार (18), महम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला (20), खालिद मुबारक कोरबू (20), जुबेर ऊर्फ कपाला शब्बीर शेख (24), महम्मदगौस ऊर्फ सरफू शेरखान फकीर (22), संतोषी बाबू नाशिककर (२६) (सर्व रा. ख्वाजा वस्ती मिरज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गंगा आणि मुक्ता नामक दोन महिला, अण्णा नामक एक व्यक्ती आणि कर्नाटकात लग्न लावून दिलेला ब्रातेश (रा. जमखंडी) अशा 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन खोक्यामधील सत्तासंघर्षात जनता वाऱ्यावर, जनाची नाही तर मनाची तरी..; कॉंग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पतीसोबत भांडण झाल्याने पीडिताने रात्री सासर सोडून पुणे रेल्वे स्टेशन गाठले. रात्री बारा वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये कराडला जाण्यासाठी बसली. मात्र झोप लागल्याने ती पहाटे थेट मिरजला पोहचली. त्यावेळी पाच नराधमांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी करण्याचे नाटक केले. त्यानंतर तुला पोलीस स्टेशनला सोडतो असे सांगून दुचाकीवरुन बामणी हद्दीतील निर्जन ठिकाणी नेले. तेथे पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून सातत्याने तिच्यावर अत्याचार करत राहिले. काही दिवसांनी तिला मिरजेतील एका महिलेकडे सोपवले. या ठिकाणी तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांनी तिचे कर्नाटकातील एकाशी लग्न लावून दिले. यासाठी कर्नाटकातील संबंधितांकडून चार लाख रुपये घेतले. मात्र तिच्याबाबतची सर्व माहिती कळताच कर्नाटकातील संबंधित व्यक्तीने काही दिवसानंतर तिला पुन्हा मिरजेतील महिलेकडे आणून सोडले.

फडणवीस अकार्यक्षम, हतबल आणि लाचार, त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना; पटोलेंचा घणाघात

मिरजेतून ती पुण्याला पतीकडे परत आली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पतीने पुढाकार घेत पुणे पोलिसांत तक्रार दिली. ती चौकशीसाठी मिरज पोलिसांकडे वर्ग झाली. सुदैवाने नराधमापैंकी मिरजेतील ख्वाजा वस्तीतील एकाचे नाव पीडितेला ज्ञात होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सात आरोपींपर्यंत पोहचले. सर्व सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल लोकेशनचीही मदत घेण्यात आली. लवकरच उर्वरित आरोपींनाही गजाआड केले जाईल, असे भालेराव यांनी सांगितले.

follow us