फडणवीस अकार्यक्षम, हतबल आणि लाचार, त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना; पटोलेंचा घणाघात

  • Written By: Published:
फडणवीस अकार्यक्षम, हतबल आणि लाचार, त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना; पटोलेंचा घणाघात

Nana Patole on Devendra Fadnavis : काल (दि. ८ जानेवारी) दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे गृहमंत्र्यांचं अपय़श असून फडणवीसांनी जीनामा द्यावी, अशी मागणी होतेय. यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. गाडीखाली एखादा श्वान आलं तरीही विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील, असं ते म्हणाले. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंन (Nana Patole) भाष्य केलं.

“पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय…” : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका 

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. ‘गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील’, असे बेजबाबदार विधान करून त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवल्याची टीका पटोलेंनी केली.

कायद्याचे तीन तेरा वाजले
पटोलेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत. गुंडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधल गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुंडांचा वावर बिनदक्कीतपणे सुरू आहे. तडीपार गुंडाना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबळ झाले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी पटोलेंनी केली.

Lal Salaam Box Office: पहिल्याच दिवशी थलायवाच्या ‘लाल सलाम’ची छप्परफाड कमाई! 

त्यांनी पुढं लिहिलं की, राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. ‘गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील’, असे बेजबाबदार विधान करून त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीसांना माणूस आणि कुत्रा यातील फरकही कळत नाही का? महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिलेल नाही, असं पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज