बिल्डर बघायला तूच पुढे होतास; गदिमांच्या पंचवटी निवासस्थानावरून माडगूळकर कुटुंबात वाद उफाळला

Panchvati-केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत, असा आरोप सुमित्र माडगूळकर यांनी केला आहे.

Panchvati G D Mandgulkar

Panchvati G D Mandgulkar

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या स्मृतींशी जोडलेल्या पुण्यातील एेतिहासिक ‘पंचवटी’ (Panchvati) निवासस्थानावरून आता माडगूळकर कुटुंबात वाद उफाळून आलाय. माडगूळकर (Madgulkar) यांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर (Sumitra Madgulkar) आणि त्यांची आई शीतल माडगूळकर यांनी एकमेंकावर गंभीर आरोप केले आहेत. जवळच्या लोकांपासून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही. केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत, असा आरोप सुमित्र माडगूळकर फेसबूक पेजवर केलाय. यांनी केला आहे. तर त्यांची आई शीतल श्रीधर माडगूळकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आईला , बहिणीला आणि मेव्हण्याला वापरलीस की ज्यांनी तुला तुझ्या अडचणीच्या काळात मदत केली, असं शीतल माडगूळकर यांनी म्हटलंय.

सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी काही कुटुंबीयांकडून पंचवटीचे पाडकाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केलाय. गदिमांची पवित्र वास्तू “पंचवटी” पाडण्यास विरोध करीत आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबाच्या (मी, माझी बायको व छोटी मुलगी) जीवाला धोका व माझी खोटी बदनामी करण्याचे कुभांड रचल्याचा आरोप गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय. गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे, तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील .गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी, बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून (अगदी ते लोक ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत ते या कटात सामील आहेत,केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोपही सुमित्र माडगहूळकर यांनी केलाय. तसेच ते म्हणतात, माझ्यावर गेले काही महिने याच्यावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत विरोध करतो आहे. विरोध करणार आहे. गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही. केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत.


‘कोणी डॉक्टर तर कोणी अभिनेता’; मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात या चेहऱ्यांचा समावेश

ज्या पवित्र वास्तूमध्ये गीतरामायण लिहिले गेले जी अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षी आहे. गदिमांचा अनेक वर्षांचा सहवास ज्या वास्तूला लाभला ती पाडावी म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत व त्याला मी विरोध केल्यामुळे आता माझ्या जीवावर उठले आहेत. यात माझा जीव गेला तरी बेहत्तर. या लोकांनी आता माझी बदनामी सुरू केली आहे मी व माझ्या कुटुंबावर खोटे नाटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमच्या कुटुंबातील ज्या बायका संसारात सुखी नाहीत त्यांनी खोट्या नाट्या पोस्ट टाकून माझी बदनामी सुरू केली आहे.


दादांसारखच माझं तटकरे कुटुंबावर प्रेम; देशात वहिनी म्हणून ओळख होईल तटकरे पवार यांची एकमेकांवर स्तुतीसुमनं

ज्या आजीवर आपल्या सख्ख्या नातीचा लैंगिक छळ केल्याच्या गुन्हा दाखल आहे व पंचवटीवर जिने भलेमोठे पुस्तक लिहिले आहे त्या बाईंचा दाखला देऊन तिचा आम्ही छळ करतो असा खोटा आरोप मी केवळ गदिमांची पवित्र वास्तू पाडायला विरोध करतो आहे म्हणून मी व माझ्या पत्नीवर करत आहेत. माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठले आहेत. खोटे नाटे कितीही ओरडून सांगितले तरी ते सत्य नसते हे आज न उद्या समोर येईलच.


10 वर्ष मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतोय-सुमित्र माडगूळकर

सुमित्र माडगूळकर म्हणतात, १० वर्षे मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतो आहे व माझ्या लढ्यामुळे स्मारकाची इमारत आता पूर्ण झाली आहे. आतल्या कामाला आता सुरुवात होईल. गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे. तितकीच गदिमांची पंचवटी माझ्यासाठी एक देऊळ आहे, या लोकांनी माझी कितीही बदनामी केली,माझा जीव जरी घेतला तरी ही वास्तू मी पाडू देणार नाही. माझी कितीही बदनामी करा माझ्यावर कोर्ट केसेस करा, पण मी लढत राहीन पण तुमचा उद्देश सफल होऊ देणार नाही, गदिमांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी ही वास्तू बिल्डरला विकू देणार नाही हे या सर्व केवळ गदिमांचे खोटे नाव घेऊन वारसा सांगणाऱ्या लबाड लांडग्यांनी म्हणजेच पडद्यामागे कारवाया करणाऱ्या नातेवाईकांनी समजावे, हिम्मत असेल तर गदिमांच्या पंचवटीला हात लाऊन दाखवा, तुम्हाला माझे चॅलेंज आहे, अंस सुमित्र माडगूळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

तेव्हा तू कुठे होतास ? सुमित्र माडगूळकरांना आईचा सवाल
या पोस्टवर लगेच सुमित्र माडगूळकर यांच्या आईने उत्तर दिलं आहे. पंचवटीबाबत अकरा मुद्दे उपस्थित करत तेव्हा तू कुठे होतास? असा प्रश्न सुमित्र यांना विचारला आहे. जेव्हा पंचवटीला रंग द्यायला हवा होता तेव्हा बाबांना पैसे तर दिले नाहीसच पण विरोधच केलास, तेव्हा तुला असे वाटले नाही का की आपलेही काही कर्तव्य आहे. पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला होता तेव्हा बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला होता. अजूनही पंचवटीच्या अंगण झाडण्याचे आणि रक्षणाचे काम करण्याचे पैसे मी आणि काकू देते. पंचवटीसाठी बिल्डर बघायला तूच पुढे होतांस. जेव्हा तुला कळले की बाबांनी wiil माझ्या नावावर केले आहे तेव्हा तू 50 % तुला हवेत आणि लीनताला जिने तुला वेळोवेळी मदत केली तिला नंतर द्यावेत असे तू सांगितलंस. पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आईला , बहिणीला आणि मेव्हण्याला वापरलीस की ज्यांनी तुला तुझ्या अडचणीच्या काळात मदत केली.

बाळा आता तरी सुधार खोटे वागण्याचे बंद कर
बाळा , आता तरी सुधार. खोटे वागण्याचे बंद कर .अजून वेळ गेलेली नाही .शेवटी सत्याचा विजय होतो आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगायला लागते हे लक्षात असू दे. आज पैशाच्या लोभाने तू आपली माणसे दूर करत आहेस. पण हीच माणसे तुझ्या प्रत्येक अडचणीला उभी राहिली आहेत, हे कायम लक्षात ठेव जेव्हा तुझ्या हे लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल. वेळीच सावर. आत्ता तुझ्या चुकीच्या वागण्याचे समर्थन तू पंचवटीच्या पाडण्याच्या पोस्टने केले आहेस लोकांच्या गदिमांविषयीच्या प्रेमाचा ,आदराचा गैरफायदा घेण्याचा तुझा हा प्रयत्न चुकीचा आहे. गदिमांच्या आणि रामरायाच्या खालच्या हॉलमधल्या फोटोसमोरच्या टेबलवर ,बाहेर जाताना पादत्राणे ठेवताना आपल्या आजोबांच्या थोरपणाची जाणीव कुठे जाते ? कोणी पाहुणे आले की आम्हाला उचलून ठेवायला लागतात. जेव्हा ड्रेनेज नको त्या वस्तू टाकल्यामुळे तुंबते ,पाणी तुळशीकट्ट्यापर्यंत जाते ते तुला कधीच दिसत नाही. मी आणि काकूच ते उभे राहून करून घेतो. नामुष्कीची वेळ तुझ्या वागण्यामुळेच माझ्यावर आली आणि तो घाणेरडा आरोप तू माझ्यावर करतोस याला काय म्हणू ? असो .परमेश्वर सारे बघत असतो आणि सत्याचा विजय होतो असा माझा विश्वास आहे. तुला लिहिलेली ही शेवटची पोस्ट ! तुझी दुर्देवी आई, असे पोस्ट म्हटलंय.


सुमित्र माडगूळकर यांचेही आईला उत्तर

प्रिय आई शीतल श्रीधर माडगूळकर, तुम्ही गदिमांचे घर पाडणार आहात यावर माझी पोस्ट जाताच तू भली मोठी माझ्या विषयी पोस्ट लिहिलीस,त्यात तुम्ही घरात किती खर्च केलात व मी कसा केला नाही ह्याचा हिशोब मांडला आहेस. आता सत्य परिस्थित मी लोकांसमोर ठेवत आहे.सोबतचे फोटो बघा ही आहे पंचवटीतील गदिमांची खोली ज्या खोलीची तुम्ही अडगळीची खोली करून टाकली आहे.याच खोलीत गदिमांचे २४ वर्ष वास्तव्य होते. बाहेरून दार बंद करून कुलूप लावले आहे,आता प्रचंड धूळ,मोडके फर्निचर अशी वाईट अवस्था गदिमांच्या खोलीचीच तू व गदिमांचे सुपुत्र आनंदी आनंद यांनी करून ठेवली आहे.आम्ही ती साफ करायला गेलो तर तुमच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करु असे तुम्ही सांगता.गदिमांच्या खोलीची ही अवस्था तुम्ही केली आहे याची जरातरी लाज असेल तर माझ्याविरुद्ध अश्या खोट्या पोस्ट टाकू नकोस,यावरूनच हे लोक गदिमांच्या घराची किती काळजी घेतात हे समोर येतेच.दुर्दैव की हे मला आज लोकांसमोर आणावे लागत आहे व माझी मनापासून इच्छा असूनही आम्हाला काहीही घरात करू देत नाहीत व गदिमांचे घर मुद्दामून वाईट अवस्थेमध्ये ठेऊन कुजून ते पडावे म्हणजे तुम्ही ते बिल्डरला विकायला मोकळे.हे लोग गदिमांच्या घराची वाट लावत आहेत.माझ्यावर खोटे आरोप करताना जरा तरी लाज बाळगा, असे सुमित्र माडगूळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

Exit mobile version