Pune News : कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार…

Pune News : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून बिबट्या पसार झाला आहे. संग्रहालयातील आवारामध्ये अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. प्रशासनाच्या मदतीने बिबट्याचे शोधकार्य सुरु आहे. कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात तीन मादी बिबट्या असून त्यांच्यासाठी एक नर बिबट्या आणण्यात आला होता. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत कर्नाटकातून हा बिबट्या आणण्यात आला होता. प्राणीसंग्रहालयातील एका ठिकाणी बिबट्याला […]

Leopard

Leopard

Pune News : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून बिबट्या पसार झाला आहे. संग्रहालयातील आवारामध्ये अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. प्रशासनाच्या मदतीने बिबट्याचे शोधकार्य सुरु आहे.

कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात तीन मादी बिबट्या असून त्यांच्यासाठी एक नर बिबट्या आणण्यात आला होता. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत कर्नाटकातून हा बिबट्या आणण्यात आला होता. प्राणीसंग्रहालयातील एका ठिकाणी बिबट्याला विलगीकरनात ठेवण्यात आले होते. मात्र 4 मार्चला सकाळी पिंजऱ्यात बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

Exit mobile version