Kishore Aware Murder : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांनी सर्वांसमोर बापाच्या कानाखाली लगावल्याने बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची कबुली
दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
कानडी राजकारणातले हुकमी एक्के जारकीहोळी बंधू! सत्ता कोणाचीही असो लाल दिवा फिक्स…
माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदल्याच्या भावनेतून ही हत्या घडवून आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक खळदे यांचा मुलगा गौरव खळदेला अटक केली आहे.
Karnataka Election : एक दोन नाही तब्बल ‘इतके’ मंत्री बसले घरी; मतदारांचा कौल गेला विरोधात
काही महिन्यांपूर्वीच जुन्या नगरपरिषद किशोर आवारे आणि भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानंतरच किशोर आवारे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपींनी कबुली दिली आहे. गौरव खळदे यांच्या सांगण्यावरुन हत्या केल्याचं आरोपींनी सांगितलं आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
UP Election Result : अतिकच्या प्रभागात भाजपचे पानिपत! पाहा, कुणी मारली बाजी ?
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दुपारी हत्या करण्यात आली. 12 मे रोजी किशोर आवारे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये आवारे यांची हत्या करण्यात आलीय. आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडण्यात आल्या त्यानंतर शस्त्राने वार करण्यात आले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
आवारे यांच्या हत्येनंतर हत्या कोणी केली याबाबतचे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. आवारेंच्या आईकडून राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यांनी एफआयआरमध्येही त्यांचं नाव घेतलं होतं. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
दरम्यान, वडगांव मावळ न्यायालयाने अटकेतील चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.