Aaditya Thackeray on Pune Airport : खोके सरकारच्या व्हिआयपींना तारखा मिळत नसल्यानेच पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं असल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमध्ये नवीन विमानतळाचं पूर्ण झालं आहे. आता हे विमानतळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून अद्याप विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलेलं नाही. यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी एक्सवर पोस्ट शेअर सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.
गेल्या वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही… का तर पुण्याची जागा हातून निसटेल ही महाराष्ट्रातल्या बेकायदेशीर राजवटीला भीती आहे म्हणून!
पण, भाजप पुरस्कृत खोके सरकार सार्वजनिक कामांची आणि नागरिकांच्या सेवेची काळजी करताना मात्र दिसत नाही!
पुण्याचं नवीन विमानतळ…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2024
आदित्य ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही…का तर पुण्याची जागा हातून निसटेल ही महाराष्ट्रातल्या बेकायदेशीर राजवटीला भीती आहे म्हणून! पण, भाजप पुरस्कृत खोके सरकार सार्वजनिक कामांची आणि नागरिकांच्या सेवेची काळजी करताना मात्र दिसत नाही! पुण्याचं नवीन विमानतळ टर्मिनल गेल्या ४ महिन्यांहून अधिक काळ तयार आहे आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे! ३ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या MTHL प्रमाणेच, ८ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले दिघा रेल्वे स्थानक व उरण लाइन प्रमाणेच…केवळ खोके सरकारच्या व्हीआयपींच्या तारखा न मिळाल्याने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन थांबले असा आरोप आदित्य ठाकरेंनी पोस्टद्वारे केला आहे.
तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रावरच सातत्याने इतका अन्याय का होतोय? मविआ सरकार बदलल्यानंतर पुण्याचा प्रस्तावित नवीन विमानतळ रखडला आहे. पुणे जिल्ह्यात येणाऱ्या वेदांता फॉक्सकॉनला खोके सरकारने अचानक गुजरातला पाठवलं (मविआ ने ते पुणे जिल्ह्यात प्रस्तावित केलं होतं) आणि आता पुण्याच्या विमानतळ टर्मिनलच्या उद्घाटनाला ४ महिने विलंब केला जात आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांबद्दल केंद्रातील सरकारच्या आणि राज्यातील राजवटीच्या मनात एवढा तिरस्कार असेल तर ह्यांच्याकडून महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा कशी करू शकेल? ते खरंच इतके व्यस्त आहेत की त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या उद्घाटनांसाठीही वेळ नाहीये? असा खोचक सवालही ठाकरेंनी केला आहे.
Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; पाकिस्तानकडून तीन प्रशिक्षकांची सुट्टी!
दरम्यान, पुरंदच्या नवीन विमानतळावरील चाचणी यशस्वी झाली असून ऑक्टोंबर 2023 पासून हे विमानतळ सुरु होण्याची शक्यता होती. या विमानतळाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडूनही माहिती घेतली जात होती. विमान कंपन्यांच्या बैठकांचाही धडाका सुरु होता, मात्र अद्याप या विमानतळाचा मुहूर्त ठरलेलाच नसल्याने आदित्य ठाकरेंनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.
525 कोटी रुपये खर्च करुन उभारले टर्मिनल
नवीन टर्मिनल सुरु करण्यासाठी 525 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात पाच एरोब्रिज केले गेले आहे. तसेच टेकऑफ आणि लॅण्डींगसंदर्भात अनेक सुविधा नव्याने विकसित केल्या गेल्या आहेत. सध्याच्या टर्मिनलवरुन 90 विमाने रोज जातात तर नवीन टर्मिनलवरुन रोज 120 विमाने जातील. तसेच रोज 32,000 ते 33,000 प्रवाशी रोज प्रवास करु शकतील.