Download App

Aaditya Thakeray राहुल कलाटेंचा संबंध नाही… महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना निवडून आणणार!

  • Written By: Last Updated:

पिंपरी : राज्यात महाविकास आघाडीत (MVA) शिवसेना (Shivsena) आहे. त्यामुळे कसबा पेठ असो की चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Peth & Chinchwad Bypoll) किंवा अन्य कोणतीही निवडणूक. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thakre) यांची शिवसेना ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी खास उद्धव ठाकरे यांनी मला येथे पाठवले आहे. त्यामुळे कसबा पेठमधून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवडला नाना काटे (Nana Kate) हेच विजयी होतील, असा ठाम विश्वास युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) यांनी व्यक्त केला.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की, आमचा उमेदवार हा विठ्ठल उर्फ नाना काटे हेच आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे.

राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. ते केव्हाही कोसळू शकते. ५० खोके एकदम ओके म्हटले की आता लोकांना नोटीसा पाठवल्या जातात. या गद्दार गटाच्या मागे भाजपची ताकद आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला की हे घटनाबाह्य सरकार कोसळणार आहे, असा जोरदार हल्लाबोल भाजप आणि शिंदे गटावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

Tags

follow us