Pune By Poll : कसब्यातून आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने घेतली माघार…

पुणे : आम आदमी पार्टीने (AAP) महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत. अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली. […]

Untitled Design (21)

Untitled Design (21)

पुणे : आम आदमी पार्टीने (AAP) महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत. अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

कसबा – चिंचवड पोटनिवडणूक सध्या राज्यात गाजत आहे. यातच या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून इतर पक्षांनी या ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहे. यातच या निवडणुकीत आप पक्षाने देखील उमेदवार उतरविला होता. मात्र आज आपच्या उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. महाराष्ट्रातील खोक्या – बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे.

कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो. कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत.

दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम व भ्रष्टाचार रहित प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्ये देखील याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचं काम सुरू आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल, अशी माहिती मेनन यांनी दिली आहे.

Exit mobile version