Download App

Maharashtra Politics: : कसब्याच्या मैदानात ‘आप’ची उडी, कोण आहे उमेदवार ?

पुणे : चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक (Kasba By Election) बिनविरोध करायची, असा भाजपचे (BJP) मत आहे. मात्र कोणत्याही पक्षाने साथ दिल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे आता निवडणुका होणार आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपबरोबर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यात आता आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) देखील कसबा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली. या निवडणुकीत आता दिवसेंदिवस उमेदवारांची उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर वंचित उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच भर म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने पार्टीचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी आज कसबा निवडणूक कार्यालयातून अर्ज घेतला. उद्यापर्यंत स्वतः विजय कुंभार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधला अंतर्गत वाद आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांची पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची नाराजी समोर आली. काँग्रेसचे उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची अपेक्षेप्रमाणे उशिरा का होईना उमेदवारी जाहीर झाली. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार देखील येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच आता आपकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वाढली. दरम्यान आपच्या इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या आहेत.

Tags

follow us