‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्यांना अभिजित बिचुकलेंनी भरला दम! म्हणाले, फासावरच..,

पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोंढवा भागातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणावरुन अभिनेते अभिजीत बिचुकलेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मला लेखी पत्र द्या, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना शोधून फासावरच लटकवतो, या शब्दांत बिचुकले यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. Karun Gelo Gaav: ‘करून गेलो […]

Abhijit Bichukle

Abhijit Bichukle

पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोंढवा भागातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणावरुन अभिनेते अभिजीत बिचुकलेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मला लेखी पत्र द्या, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना शोधून फासावरच लटकवतो, या शब्दांत बिचुकले यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

Karun Gelo Gaav: ‘करून गेलो गाव’ नाटकाच्या टीमकडून इर्शाळवाडीला मदतीचा हात!

बिचुकले म्हणाले, पुणे हे एक सांस्कृतिक शहर असून पाकिस्तान जिंदाबादचे नारे कदापी खपवून घेणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काय करतंय? ते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलेत का? मला लेखी पत्र द्या, मी त्यांना शोधून फासावर लटकवतो, असे बिचुकले म्हणाले आहेत.

‘2024 साठी आशिर्वाद मागता, आधी फडणवीसांकडून शिका’; ठाकरे गटाचा मोदींना खोचक सल्ला

नेमकं काय घडलं?
पुण्याच्या कोंढवा भागात नुकतीच पाकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी अकबर नदफ व तौकीर नामक 2 आरोपींना ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सुरक्षा रक्षक असल्याची माहिती उजेडात आली आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, अहमदनगरमध्येही स्वातंत्र्यदिनी भारताविरोधात घोषणा केल्याचा प्रकार घडला आहे. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये काही समाजकंटकांकडून भारताविरोधात घोषणा करण्यात आली होती. पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता पुण्यातही असाच काहीसा प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version