Pune Traffic Rules : पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याने आता पुणे वाहतुक पोलिसांकडून (Pune Traffic Police) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलीस आता एआयचा (AI) वापर करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुण्यात एआय कॅमेरांद्वारे (AI Camera) दंडाच्या पावत्या फाडल्या जाणार आहे.
पुणे पोलिसांकडून प्रायोगिक तत्वावर सध्या एफसी रोडवर (FC Road) असणाऱ्या वैशाली हॉटेल (Vaishali Hotel) समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला असून वाहातुक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अचूक आणि कार्यक्षमपणे करणे हा या मागचा हेतू असल्याची माहिती देखील पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
एफसी रोडवर आता AI कॅमेरांची करडी नजर!
पुण्याच्या सर्वाधिक वर्दळीच्या एफसी रोडवर आता वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरा सिस्टिम लक्ष ठेवणार आहे.#UpgradingTraff pic.twitter.com/mEoioaOYJ3
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) May 29, 2025
पुणे पोलीस आता एआयच्या मदतीने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ओळखणे, त्यांची नोंद ठेवणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे इत्यादी प्रकारचे काम करणार आहे. एआय कॅमेरा रात्रीच्या वेळी देखील अचूक पद्धतीने काम करत असल्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर 24 तास निगराणी ठेवणे शक्य होणार आहे.
तर दुसरीकडे एफसी रोडवर दररोज हजारो वाहने ये- जा करत असल्याने या रोडावर वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर एआय कॅमेरा बसवण्याचा निर्णय पुणे पोलिसांकडून घेण्यात आला आहे.
रशियाचा मित्र कोण, चीन, भारत की बेलारुस? रशियात झाला सर्वे; भारताला ‘इतक्या’ लोकांचा पाठिंबा
तसेच सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, हेल्मेट घालावे, सिग्नल पाळावे आणि स्पीडमर्यादा राखावी असे आवाहन देखील यावेळी पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.