आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार; ‘रयत’मध्ये एआय तंत्रज्ञान आणणार -शरद पवार

Sharad Pawar : सामान्य लोकांच्या मदतीने रयत शिक्षण संस्थेचे कामे सुरू आहेत. शून्यातून कामाची सुरूवात झाली, आज संस्थेच्या हजारो शाखा आहेत. कर्मवीरांनी ‘कमवा आणि शिका’ योजना काढली, त्यातून मोठे झालेले विद्यार्थी संस्थेच्या पाठीशी आहेत. रयतचा शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Sharad Pawar) आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी रयत कायम प्रयत्नशील आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, असं प्रतिपादन रयतचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शाळेच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
धनंजय मुंडेंना पाठीशी का घातलं? शरद पवारांवर अंजली दमानिया भडकल्या
की या शाळेची सुंदर वास्तू उभारण्यात केवळ ग्रामस्थांनीच नाही, तर रायगड जिल्ह्यातील रामशेठ ठाकूर यांनी देखील मोलाची मदत केली. ते खासदार होते पण त्यांना राजकारणात नव्हे, तर समाजकारणात रस आहे. ते दरवर्षी रयतला कमीत कमी पाच कोटी रुपयांची मदत करतात. रयतच्या ‘कमवा आणि शिका योजनेतून ते मोठे झाले. दानशूर विद्यार्थी हे रयतचे वैशिष्ट्य आहे. चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळा समितीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे यांनी शाळेच्या इमारत बांधकामांची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, देणगीदार प्रतिनिधी म्हणून महेद्रशेठ घरत, तसेच केंद्र प्रमुख डॉ. संजय कळमकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.
कळमकरांच्या कवितेला दाद
डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या भाषणात ‘शरद उभा हो’ ही कविता सादर केली. शरद पवार यांनी देखील या कवितेला दाद दिली. रयत शिक्षण संस्थेने आम्हाला जगण्याची दिशा दाखविली. आमच्या पंखात बळ भरले, असे सांगून त्यांनी राजकारणावर मार्मिक टिपण्णी केली. बाहेरचे राजकारण वेगाने बदलत असून शाळेतले नागरिकशास्त्र आता कालबाह्य झाल्याचे सांगितले.
देणगीदारांचा सन्मान
कार्यक्रमात देणगीदार रामशेठ ठाकूर, महेद्रशेठ घरत, पी. एस. डेव्हलपर्सचे संचालक फकीरा पवार व इंजिनिअर विनायक सुरकुटला, अनिल पवार, सतीषकुमार खडके, इंजिनिअर अनिल सांळुके व रामचंद्र नलगे यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या शरद पवार यांच्या १७ फुटी तैल चित्राचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
चिचोंडी पाटील येथील शाळेच्या इमारतीसाठी निधी उभा राहावा, यासाठी आबासाहेब कोकाटे यांनी धडपड केली, त्यांची ही धडपड पाहूनच शाळेला निधी दिला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या, परंतु चिचोंडी पाटील येथील शाळेची इमारत अधिक प्रशस्त आणि सुंदर झाली असल्याचे यावेळी माजी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. याप्रसंगी ॲड. भगीरथ शिंदे, महेंद्रशेठ घरत, सतीशकुमार खडके, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, दादा कळमकर, मीनाताई जगधने, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाबासाहेब भोस आदी मान्यवर उपस्थित होते.