धनंजय मुंडेंना पाठीशी का घातलं? शरद पवारांवर अंजली दमानिया भडकल्या…

धनंजय मुंडेंना पाठीशी का घातलं? शरद पवारांवर अंजली दमानिया भडकल्या…

Anjali Damania Question To Sharad Pawar On Dhananjay Munde : बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) भडकलेल्या आहेत. त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांना अगदी सळो की पळो करून टाकलंय. तर अलीकडे शरद पवरा यांनी काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. आज बीडमध्ये याचेच परिणाम दिसत आहेत, असं वक्तव्य केलंय. यावरून आता अंजली दमानिया यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनाच काही सवाल केलेत. सोबतच शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला देखील दिलाय.

आज माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी जर आधीच नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या अन् तिथल्या तिथेच शरद पवार यांनी त्यांना धडा शिकवला असता, तर हे सगळं आज घडताना दिसलं नसतं. आधीच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कान का पकडले नाही? हे सगळं थांबवलं गेलं पाहिजे, असा आक्रमक पवित्रा दमानिया यांनी घेतला आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान सैन्याच्या 8 बसेसवर BLA चा मोठा हल्ला; तब्बल 90 सैनिक ठार

दरम्यान अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं, असं मागे शरद पवार म्हणाले होते. तर मग मु्ंडेंच्या कोणत्या गोष्टी पाठीशी घातल्या? त्यांच्या गोष्टी तुम्ही का पाठीशी घातल्या होत्या? वेळीच शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना धडा शिकवला असता, तर आज हे सगळं घडलन नसतं. बीडमधील पंकजा मुंडे सोडल्या, तर सगळे आमदार त्यांच्या पक्षातलेच होते. शरद पवारांनी त्यांना काय शिकवलं, असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ; नामविस्ताराला एकमुखी कडाडून विरोध, अधिसभेत जोरदार विरोध

वाढत्या गुन्हेगारीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भूमिका आक्रमक आहे.दमानिया यांनी म्हटलंय की, जो चुकीचा वागेल त्याच्यावर प्रत्येक पक्षाने कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. जर हे थांबत नसेल तर या पक्षांवर बहिष्कार टाका, अशी मागणी करणं देखील गरजेचं असल्याचं दमानिया यांनी स्पष्ट केलंय. शरद पवारांनी धनंजय मुंडेंना इतकी वर्षे पाठिशी का घातलं? असा थेट सवाल अंजली दमानिया यांनी केलाय. आता यावर शरद पवार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube