Download App

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… पुण्यात पुन्हा झळकले अजित पवारांचे बॅनर

Ajit pawar banner in Kothrud : गेल्या काही दिवसांपासुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना खुद्द याबाबत त्यांनीच उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात त्यांच्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर पुण्यात झळकले आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजितदादा पवार अशा आशयाचे बॅनर झळकल्याने पुन्हा राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. यावर खुद्द अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपि भूमिका मांडली व या चर्चांना पूर्णविराम दिला. आता या चर्चा सुरू असतानाच त्यात आणखी एका घटनेने भर घातली आहे. अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकले आहे.

दरम्यान नुकतेच अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजित पवारांचा मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. कोथरूडमध्ये अचानक अजित पवार यांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, ‘या’ संघटनेने दिली धमकी

मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल
अजित पवार यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं.

Tags

follow us