अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, ‘या’ संघटनेने दिली धमकी

अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, ‘या’ संघटनेने दिली धमकी

Gangster Atiq Ahmed : कुख्यात गँगस्टर अतिक अहमद (Gangster Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांच्या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे. नुकतेच पटना येथील मशिदीबाहेर अतिक अमर रहे अशा घोषणा काहींकडून देण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवादी संघटना अल-कायदा (Al-Qaeda) ने या हत्यांचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता तपास यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उमेश पाल यांचे 2006 मध्ये बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्यामुळे माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या दोघांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने अटक केली होती.

दरम्यान काही काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या बाहेर पत्रकार बनून आलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघा भावांवर थेट गोळीबार केला. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित तिन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी अशी त्यांची नावे आहेत. याच्या दोन दिवस आधीच झांसी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मारला गेला होता.

धमकीचा ईमेल
अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटने (AQIS) सात पानी मॅगझिन जारी करत गँगस्टर अतिकच्या हत्येवरून भारतात दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. आपल्या संदेशात अल-कायदाने भारताचा बदला घेणार असल्याचे या मॅगझिनमध्ये म्हटले आहे. याशिवाय या दहशतवादी संघटनेने (Terror group) अतिक आणि अशरफ यांचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे. या धमकीनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील संवेदनशील भागांसह प्रयागराजमध्ये सुरक्षा अधिक मजबूत केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube