Ajit Gavhane On Mahesh Landge : महापालिका निवडणुकीत पराभव दिसतोयं म्हणूनच पायाखालची वाळू सरकली असल्याचं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजितदादांचे शिलेदार अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी दिलंय. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला गव्हाणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. ते लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलत होते.
अजित गव्हाणे पुढे बोलताना म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची सुत्रे अजित पवार यांनी हाती घेतलेली आहेत. त्यामुळे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे. आपला पराभव दिसत असल्याने आमदार महेश लांडगे यांच्या पायाखालची जमीन सरकलीयं, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांशी एकेरी भाषेत बोलू नये, ही आपली संस्कृती नाही या शब्दांत अजित गव्हाणे यांनी लांडगे यांना प्रत्युत्तर दिलंय.
राहुल कलाटेंच्या पुढाकारानं वाकडमध्ये साकारतयं आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम
तसेच २०१७ च्याआधी अजित पवार यांच्या हाती पिंपरीची सत्ता होती. विकासकामांच्या गतीने अजितदादांनी पिंपरी चिंचवडला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. या भागातील नागरिकांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. 2017 नंतर ज्यांची हाती सत्ता गेली त्यांचा अनुभव आता नागरिकांना आलायं, आता लोकांना त्याचा त्रास होत असल्याचंही गव्हाणे म्हणाले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप उमेदवारांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचा जाहीर पाठिंबा
महापालिकेचं बजेट 9600 कोटींचं होतं. या 9 वर्षांत 40 हजार कोटी रुपये खर्च झालेत, पण शहरात हे पैसे गेले कुठे तेच समजना. शहरात लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज लोकांना नीट मिळत नाहीत. मोठ्या कामावर अधिक खर्च केला, पण लोकांच्या पदरात काहीच नाही पडलं. याचा लोकांमध्ये याचा प्रचंड संताप असल्याचंही गव्हाणेंनी स्पष्ट केलंय.
