Download App

भेगडेंची घरवापसी झाल्यास दोन पाऊलं मागे येणार; सुनिल शेळकेंनी क्लिअर सांगितलं

महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माझी दोन पाऊलं मागे येण्याची तयारी, पण स्वार्थासाठी जवळ येऊ नका, असं म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट केलंय.

Sunil Shelke On Bala Bhegde : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माझी दोन पाऊलं मागे येण्याची तयारी, पण स्वार्थासाठी जवळ येऊ नका, असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनिल आण्णा शेळके (Sunil Shelke) यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलायं. बाळा भेगडे आणि रविंद्र भेगडे पुन्हा सोबत आले तर महायुतीत एकत्र काम करणार का? असा थेट सवाल शेळके यांना करण्यात आला होता. त्यावर लेटस्अप मराठीशी बोलताना त्यांनी परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

महायुतीतील मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. मी संघटनेतून मोठा झालो असून मला वातं की आपण कार्यकर्त्यांना महायुतीचा धर्म पाळायला हवा. निवडणुकीत मतभेद होत असतात, माझ्या मतदारसंघात वैचारिक लढत व्हायला हवी होती पण तसं न घडता वेगळी लढत झाली. तरीही माझ्याविरोधात काम करणाऱ्यांची सोबत येऊन काम करण्याती तयारी असेल तर महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माझी दोन पाऊलं मागे येण्याची तयारी असल्याचं आमदार शेळके यांनी स्पष्ट केलंय.

विंडीजच्या धुवाधार फलंदाजीसमोर टीम इंडिया फ्लॉप; दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून सुनिल शेळकेंना मावळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेत बापू भेगडे यांचा खुलेआम प्रचार करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. या वादात देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेत नाराजी शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र फडणवीसांचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. अखेर मोठ्या मताधिक्क्याने अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी विजय मिळवला.

‘बाळा भेगडे पलटू मामा’
फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत बाळा भेगडेंनी महायुतीचं काम करावं, असं ठरलं होतं. सुनील शेळकेंना निवडूण आणा, असे आदेश फडणवीसांनी बाळा भेगडेंना दिले. त्यांनीही होकार दिला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना अशी काही चर्चा झाली नाही, असं भेगडेंनी सांगितलं. बाळा भेगडे हा पलटू मामा आहे, त्यांनी जे माध्यमांना सांगितलं, ते साफ खोट आहे. फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेत ते महायुतीचं काम करतील असं ठरलं होतं, पण त्यांनी पटली मारली असल्याचं आमदार सुनिल शेळकेंनी स्पष्ट केलं होतं.

अजित पवार गटात छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. ते अजितदादांसोबत आधीपासूनच आहेत. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही यामागे काही वेगळी कारणे असू शकतात. पुढील काळात त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय महायुतीकडून घेण्यात येईल. भुजबळांना डावलण्याचा हेतू कोणाचाही नसल्याचं आमदार शेळके यांनी स्पष्ट केलंय.

follow us