पुणे : काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याचं जाहीर केलं. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरू असल्याच्या समोर आलं. प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेण्याची माझी तयारी आहे, याबद्दल आम्हाला पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागेल, आम्ही बसू आणि यावर सविस्तर चर्चा करू. आमच्या मनात सकारात्मक भूमिका घेऊन जात पुढे जाणं आहे, तसं त्यांच्या मनात आहे का हे देखील पहावं लागेल. महविकास आघाडी टिकावी आणि त्यात बेरीज होण्याकरता जे असतील त्यांनी यावं. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल.
सध्या वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे. समजा पुढे आम्ही एकत्र लढलो तर पुढची निवडणूक नक्कीच वन साईडेड होईल. कारण वंचितला मानणारा मोठा वर्ग आहे. वंचितला महाविकास आघाडीसोबत घ्यायची माझी वैयक्तिक तयारी आहे. मात्र मला इतरांचं माहित नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीत वंचित यावी ही माझी वैयत्तिक इच्छा आहे, वरिष्ठ आणि पक्ष काय तो निर्णय घेईल. महविकास आघाडीत एकत्रित बोलत असताना कुणाचा अपमान होणार नाही, याची जबाबदारी सर्वांनी घ्याला हवी. वंचितला मविआमध्ये घेण्याबद्दल अजित पवारांची पहिल्यांदाच महत्वाची प्रतिक्रया दिली.