Download App

माजी आमदार अशोक टेकवडेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवार बोलले

पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचं स्थानिकांशी जमत नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक टेकवडे भाजप प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीत खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे.

सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन नवे न्यायाधीश! कॉलेजियमकडून ‘या’ दोन नावांची शिफारस

अजित पवार म्हणाले, अशोक टेकवडे हे माझेच कार्यकर्ते होते. त्यांना मीच पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत संचालक, चेअरमन केलं होतं. त्यानंतर आमदाराही केलं.

पण त्यानंतर अशोक टेकवडे यांचं स्थानिकांशी आणि पक्षांतर्गत जमत नव्हतं. त्याबद्दल मी दोघांशीही चर्चा केली होती. पण दुर्देवाने त्यातून मार्ग निघाला नसल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

सातारा जिल्ह्यात होणार पोलीस प्रशिक्षण केंद्र; मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

दरम्यान, अशोक टेकवडे यांचा टोकाचा निर्णय घेण्यामागे इतरही कारणे असू शकतात. मध्यांतरी त्यांच्या घरी इनकम टॅक्सची धाड पडली असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळेच त्यांना हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे.

समीर वानखेडे ‘या’ तीन गोष्टीमुळं अडचणीत, CBI कडून चौकशीचा फास

पुरंदरमध्ये अशोक टेकवडे यांच्या रुपात मोठी ताकद उभी होती. मात्र, भाजपच्या नेत्यांनी पुणे जिल्हा टार्गेट केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोहीम पुण्याकडे वळली असल्याची चर्चा आहे.

अशोक टेकवडे यांचे पक्षातील काही लोकांशी जमत नसल्याचं बोललं जात असून ते काही दिवसांपासून नाराज असल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळेच त्यांनी टोकाची भूमिका घेत भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Tags

follow us