समीर वानखेडे ‘या’ तीन गोष्टीमुळं अडचणीत, CBI कडून चौकशीचा फास

समीर वानखेडे ‘या’ तीन गोष्टीमुळं अडचणीत, CBI कडून चौकशीचा फास

CBI registered a case against Sameer Wankhede : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणी अटक करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या अडचणीत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांची पाळंमुळं खणायला सुरुवात केली आहे.

समीर वानखेडे हे सध्या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वानखेडेंवर गुन्हा दाखल केला. एनसीबीने केलेल्या विशेष तपासाच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी अयोग्य आणि अप्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याचे एनसीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणातील संशयितांकडून बेकायदेशीर फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Gautami Patil: गौतमी पाटीलचं लग्नाबाबत भाष्य; म्हणाली, ‘तुम्ही लग्नाला या आणि तिथेही…’

एकेकाळी मुंबईतील ड्रग्ज माफियांचे कर्दनकआळ म्हणून ओळखले जाणारे समीर वानखेडे यांची मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द होती. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई एनसीबीने बॉलीवूडमधील अनेक व्यक्तींवर कारवाई करून त्यांची चौकशी केली आहे. समीर वानखेडे त्यांच्या धाडसी कृतीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांच्या हातातील घड्याळे व इतर चैनीच्या वस्तू याची तर माध्यमात कायम चर्चा होती. वानखेडे यांनी विभागाला न कळवता खासगी संस्थेकडून महागडे मनगटी घड्याळे खरेदी करून विकल्याचेही तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे परदेश दौरेही चर्चेचा विषय ठरले होते. चौकशीत समीर वानखेडेंना या परदेश दौऱ्यांच्या खर्चाबाबत समाधानकारक खुलासा करता आला नाही.

वानखेडेंची मिळकत-मालमत्ता जुळत नाही
तपासादरम्यान समीर वानखेडे यांचे उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात ताळमेळ नसल्याची बाबही समोर आली आहे. वानखेडे हे विरल रंजन नावाच्या व्यक्तीसोबत महागडी घड्याळे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. याबाबत वानखेडे यांनी कोणतीही माहिती दिली नाही. वानखेडे यांनी परदेश प्रवास खर्चाची माहिती देखील चुकीची दिली आहे.

समीर वानखेडेंनी 25 कोटी मागितले, 18 कोटींत सौदा पक्का
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या कुटुंबाकडून त्याच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली. आणि त्यानंतर तडजोड करून त्यांनी 18 कोटी रुपये घेण्याची तयारी दर्शवली. त्यातले 50 लाख रुपये हे के.पी. गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी घेतले होते. मात्र, नंतर त्यांनी 50 लाख रुपये परत केल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, त्यांच्याविरूधद् भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7A आणि 12 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 120B (गुन्हेगारी कट) आणि 388 (धमकीने खंडणी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube