राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे कायम आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अजितदादांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar ) यांनी भक्कमपणे साथ दिली आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करत आहे. यावेळी त्यांनी सुनेत्राताईंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले जीवन साधना गौरव पुरस्कार’ प्रदान केला आहे. शिक्षण आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. तसेच अजितदादांना त्यांनी बनवलेला कोणता पदार्थ आवडतो, ते देखील त्यांनी सांगितले आहे.
अजितदादांना तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांना मी बनवलेली पुरण पोळी व साबुदान्याची खिचडी अजितदादांना आवडते, असे त्यांनी सांगितले. तसेच अजितदादांना शॉपिंग करण्याची देखील खुप आवड आहे. त्यातही विशेषकरुन ते आम्हा सर्वांसाठी साड्या खरेदी करत असतात. कामाच्या निमित्ताने ते दिल्ली, कलकत्ता, अथवा साऊथकडे कुठेही गेले तरी ते घरातील लोकांसाठी खरेदी करत असतात, असे सुनेत्रा वहिनींनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
तसेच सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना मी आमच्या काकी प्रतिभाताई पवार यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना पार्थ पवार हे पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का?, असे विचारण्यात आले. यावर बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या घरी प्रत्येकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय ते स्वत: घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.